Gaikwad Firing Case Saam Tv
क्राईम

Ulhasnagar Gaikwad Firing Case: भाजप आमदार गणपत गायकवाड यांना १२ दिवसांची पोलीस कोठडी

Gaikwad firing case: शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि इतर ५आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते.

Bharat Jadhav

Ulhasnagar Ganpat Gaikwad firing case:

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काल शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने गणपत गायकवाड यांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. (Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि इतर पाच आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावलीय. गायकवाड यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याची चौकशी करायची आहे. गायकवाड यांच्या आवाजाचे नमुनेही घ्यायचे आहेत, त्यामुळे १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती.

आज उल्हासनगर कोर्टात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार गायकवाड यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर ठेवलं जाणार होतं.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत गणपत गायकवाड यांना कोर्टात प्रत्यक्ष हजर करा, अशा सूचना न्यायाधीशांनी पोलिसांना दिल्या होत्या. त्यानंतर उल्हासनगर कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी न्यायाधीश ए ए निकम यांच्यासमोर जोरदार युक्तिवाद केला. यामध्ये फक्त राजकीय वैमनस्याचा प्रश्न नाही तर जमिनीचा आणि पैशांचा विषय आहे. यासाठी सखोल तपास होणे आवश्यक असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

काय म्हणाले गणपत गायकवाड यांचे वकील

आरोपींचे वकील राहुल आरोटे यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. आरोपी गणपत गायकवाड यांच्या बॉडीगार्डकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर होतं. तो आमदारांसोबत २४ तास असतो. या गोळीबारामागे जीवे मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असा युक्तिवाद वकील आरोटे यांनी केला.

मी माझा गुन्हा कबुल करतोय

मी गोळ्या झाडल्या. त्यामुळे कुठलाही कट रचण्याचा प्रश्न नाही. यामध्ये कट रचण्याच कलम का लावण्यात आलंय? माझ्या मुलाला का अडकवण्यात आलंय? मी माझा गुन्हा कबुल करतोय. इतरांचा यामध्ये सहभाग नाही, मला या कृत्याचा पश्चाताप नाही. मी एक व्यावसायिक असून माझ्या मुलासाठी मी हे सगळं केलं. कोणी माझ्या मुलाला मारत असेल तर मी हे सहन करू शकत नाही. एक बाप म्हणून मी हे केलं आहे,"अशी कबुली गायकवाड यांनी दिली.

दरम्यान गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड रुग्णालयात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलीय. तर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप गणपत गायकवाड यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : दादर माहिममध्ये महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT