Gadchiroli Naxalism News :  Saamtv
क्राईम

Gadchiroli News: गडचिरोलीत नक्षलवादी पुन्हा सक्रिय; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या

Gadchiroli Naxalism News : लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच गडचिरोलीमध्ये नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून पोलीस खबरी असल्याच्या संशयातून एकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

मंगेश भांडेकर, गडचिरोली|ता. २९ मार्च २०२४

Gadchiroli News:

एकीकडे लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच गडचिरोलीमध्ये नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर आता गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून पोलीस खबरी असल्याच्या संशयातून एकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका आदिवासी नागरिकाची गळा आवळून हत्या केली. अशोक तलांडी ( रा.दामरंचा) असे मृत व्यक्तीचे नाव असून आज, शुक्रवारी सकाळी भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

लोकसभा निवडणुकीच्या (loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. गुरूवारी देखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक चालली.

दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा गावातील रहिवासी असलेल्या अशोक तलांडी या आदिवासी व्यक्तीचा भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतदेह शेजारी टाकलेल्या पत्रकात नक्षल्यांनी अशोक हा पोलीस खबऱ्या असल्यामुळे त्याची हत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगच्या मध्यवर्ती रुग्णालयातील सिटीस्कॅन सेंटर बंद

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

SCROLL FOR NEXT