Fight in Meeting : मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी; उमेदवारांकडून पैसे घेतल्याचा आरोप

Fight in maratha Community Meeting : लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना, छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे.
Fight in Meeting
Fight in Meeting Saam tv
Published On

रामू ढाकणे, छ. संभाजीनगर

Sambhajinagar fight Video :

लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना, छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. उमेदवारांकडून पैसे घेतल्याच्या आरोपातून ही हाणामारी झाल्याचं कळतंय. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा बांधवांची (Maratha Community) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलं आहे. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. याच बैठकीत महिला कार्यकर्त्या देखील उपस्थिती होत्या. बैठक सुरु असतानाच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काही जण दुसऱ्या उमेदवाराकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप करत या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली.

Fight in Meeting
Sambhaji Nagar News: मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याचा राग; पित्याने मावसभावासह मुलाला कारखाली चिरडलं

नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजाच्या बांधवांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले.

काही कार्यकर्त्यांनी काही लोक येथे उमेदवारांकडून पैसे घेऊन आले आहेत, असा आरोप करत समाज बांधवांची एकमेकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर या बैठकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे ही बैठक स्थगिक करण्यात आली. या हाणामारीनंतर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा पोहोचला. पोलिसांनी घटनास्थळी शांतता प्रस्थापित केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com