Lok Sabha Election 2024 : विरोधकांनी पैसे दिले तर घ्या, मत मात्र काँग्रेसलाच करा; शिवसेनेच्या माजी आमदाराचा अजब सल्ला

Dinkarrao Mane Statement : लातूर जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये वातावरण तापल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षाकडून कार्यकर्त्यांच्या कॉर्नर बैठका आणि कार्यकर्त्यांचे
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam tv

संदिप भोसले

Latur Lok Sabha Constituency :

राज्यात लोकसभा निवडणुकीत जास्तीत-जास्त जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. अशात शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे. विरोधकांनी पैसे दिले तरी घ्या, पण मत मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेसलाच करा, असा सल्ला दिनकरराव माने यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Lok Sabha Election 2024
Madha Lok Sabha Election 2024 : 'माढा'त मराठा समाजातील 50 जणांनी ठाेकला शड्डू; उमेदवार निवडीचे सर्वाधिकार मनाेज जरांगे पाटलांना

लातूर जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये वातावरण तापल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षाकडून कार्यकर्त्यांच्या कॉर्नर बैठका आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात झाली आहे. काल महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान याच बैठकीत भाषण करताना शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे. विरोधकांनी पैसे दिले तरी घ्या. ते सांगतील शपथ घ्या की मत आम्हालाच करा. त्यावेळी हो म्हणा आणि मनातल्या मनात शपथ घ्या की, मत काँग्रेसलाच करणार. असे करताना विरोधकांनी पैसे दिल्यास ते देखील घ्या, पण मत मात्र काँग्रेसलाच करा, असा सल्ला दिनकरराव माने यांनी दिला आहे.

लातूर लोकसभा मतदार संघात भाजपकडून सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिनकरराव माने यांनी केलेल्या वक्तव्याने भाजप आणि काँग्रेसमधील वातावरण आणखी तापल्यांचं चित्र समोर दिसत आहे.

Lok Sabha Election 2024
Sangli Politics : ठाकरे गटाच्या सांगलीच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरीचे संकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com