Gadchiroli Crime Yandex
क्राईम

Gadchiroli Crime : वृद्ध दाम्पत्याची हत्या केली, मृतदेह नदीत फेकले; गडचिरोलीतील धक्कादायक घटना

Dead Body thrown into river after killed old age couple : गडचिरोलीत वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह नदीत आढळून आलाय. या दाम्पत्याची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह नदीत फेकले असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

मंगेश भांडेकर, साम टीव्ही गडचिरोली

गडचिरोलीमध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या करून मृतदेह नदीत फेकले असल्याची धक्कादायक घटना घडलीय. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील करपनफुंडी गावाती हे दाम्पत्य असल्याची माहिती मिळतेय. या दाम्पत्याची हत्या करून मृतदेह बांडे नदीत फेकल्याने एकच खळबळ उडाली आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह नदीत आढळला

याबाबत सविस्तर वृत्त असं की, मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी हातापायाला दोरी आणि दगड बांधलेल्या स्थितीतील एका महिलेचा मृतदेह बांडे नदीत आढळला (Gadchiroli Crime News) होता. त्यानंतर बुधवारी २८ ऑगस्ट रोजी तेथून ८ किलोमीटर अंतरावर एका पुरूषाचा मृतदेह नदीपात्रात आढळला. त्यानंतर हे दोन्ही व्यक्ती दामप्त्य असल्याचं समोर आलं होतं.

गडचिरोलीतील धक्कादायक घटना

बुरगू रैनू गोटा आणि रैनू जंगली गोटा, अशी मृत दाम्पत्याची ओळख पटली. या रहस्यमय घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पाच पथके तयार केली आहेत. याप्रकरणी त्यांनी चार संशयितांना ताब्यातही घेतले (killed old age couple) आहे. गोटा दाम्पत्य शनिवारपासून गायब होतं. नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतर पत्नीचा नदीपात्रात मृतदेह आढळला. मात्र रैनूचा थांगपत्ता लागलेला नव्हता. त्यामुळे शोधमोहिम आणखी तीव्र करण्यात आली होती.

वृद्ध दाम्पत्याची हत्या

या दाम्पत्याची हत्या झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला (Gadchiroli Crime) होता. त्यानंतर नक्षलग्रस्त आणि दुर्ग असलेल्या या भागात पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्यात एका पुरूषाचा मृतदेह त्याच नदीपात्रात आढळला. या दाम्पत्याची हत्या जादुटोण्याच्या संशयातून झाली की, संपत्तीच्या वादातून हे अद्याप स्पष्ट (Gadchiroli News) नाही. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहे, आतापर्यंत ४ संशयितांना ताब्यात घेतलंय. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT