Maharashtra Crime News Saam Tv
क्राईम

Jeevansathi Scam : "मंत्रालय, पोलिस दलातील अधिकारी माझ्या ओळखीचे...", कोकणातल्या बनावट पोलिसाने तरुणींना घातला गंडा

Maharashtra Crime News : सोलापूरमध्ये तरुणाने बनावट पोलीस असल्याचे भासवून जीवनसाथी ॲपवरून ६० तरुणींना नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातला. सायबर पोलिसांनी आरोपीला मुंबईतून अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • बनावट पोलीस बनून तरुणाने जीवनसाथी ॲपवरून ६० तरुणींना फसवलं

  • नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला

  • सोलापूर सायबर पोलिसांनी मुंबईतून आरोपीला अटक केली आहे

  • आरोपीविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सोलापूरमधून धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट खाकीचा माज दाखवत एका तरुणाने जीवनसाथी ॲपवरून अनेक तरुणींना फसवल्याची घटना घडली आहे. या तरुणाने नोकरीला लावतो तसेच लग्नाचं आमिष दाखवत राज्यातील वेगवेगळ्या भागातील ६० तरुणींना गंडा घातला आहे. या तरुणाला पोलिसांनी मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपी तरुणाचं नाव वैभव नारकर असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गोविळ मधला असून तो मुंबईतील नायगावमध्ये राहत होता. त्याने सोलापुरातील एका तरुणीशी ओळख करून तिच्याशी मैत्री केली आणि बोलणे सुरू केले. काही दिवस गेल्यावर त्याने १९ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात त्या मुलीकडून त्याने मावस भाऊ व मावशीचा अपघात झाला असून ते मयत झाल्याचे सांगून ६३ हजार रुपये लुबाडले. त्या मुलीच्या तक्रारीनंतर सोलापूर शहर सायबर पोलिस त्याचा शोध घेत होते.

याशिवाय वैभवने जीवनसाथी ॲपवरून सात-आठ मुलींना विवाह करतो म्हणून लग्नाचे आमिष दाखवले. त्यांच्याकडूनही त्याने पैसे उकळल्याचं उघडकीस आलं आहे. याशिवाय त्याने ४० ते ५० मुलांशी संपर्क करून नोकरीचे आमिष दाखविले होते. मंत्रालय, पोलिस दलात मोठे अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत असे सांगून त्याने त्यांना नोकरीचे आमिष दिले होते. त्यांच्याकडूनही संशयिताने लाखो रुपयाला गंडा घातल्याची बाब तपासात समोर आली आहे.

पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या नेतृत्वातील पोलिस उपनिरीक्षक नागेश इंगळे, पोलिस अंमलदार कृष्णात जाधव, निलेश गंगावणे, नितीन आसवरे, मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने संशयिताला मुंबईतून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Crime : पती बेपत्ता असल्याची तक्रार;दीड महिन्यानंतर धक्कादायक माहिती आली समोर, प्रियकराच्या मदतीने नदीत जिवंत फेकले

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी जाहीर, कधी, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

Bogus Voter List : 'प्रत्येक ठिकाणी 4 लाख बोगस मतदार'; व्होटचोरीचं लोण मुंबईपर्यंत, वाचा स्पेशल रिपोर्ट

Pothole Deaths : 'खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई'; मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिला? जाणून घ्या

Makyacha Chivda Recipe: दिवाळीसाठी कुरकुरीत खमंग मक्याचा चिवडा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT