Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

Minor Girls Rescue: झारखंडमधील रांचीच्या तुपुदाना भागात चार अल्पवयीन मुलींना कथितरित्या एका घरात डांबून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एका मुलीच्या प्रसंगावधानामुळे पोलिसांनी तातडीने छापा टाकून इतर मुलींची सुटका केली आणि सहा जणांना ताब्यात घेतलं.

Surabhi Jayashree Jagdish

झारखंडमधील रांचीमध्ये तुपुदाना भागात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आलीये . चार अल्पवयीन मुलींना एका खोलीत डांबून ठेवून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडलीये. सुदैवाने यातील एका मुलीने कशाबशा प्रकारे तिथून सुटका करून घेतली आणि थेट पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला आणि तिथे अडकलेल्या इतर तीन मुलींची सुखरूप सुटका केली.

सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी तुपुदाना पोलिसांनी तातडीने पावलं उचलत सहा जणांना अटक केलीये. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील न्यायालयीन कारवाई सुरू केली आहे.

स्मार्ट सिटी फिरवण्याच्या बहाण्याने बोलावलं

सिटी एसपी (पोलीस अधीक्षक) पारस राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या चौकशीत असं समोर आलंय की, पीडित मुलींमधील दोन मुलींची आरोपींपैकी दोघांशी आधीपासून ओळख होती. या मुलींना 'स्मार्ट सिटी' फिरवण्याच्या बहाण्याने बोलावून घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना एका घरात नेऊन त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान प्रसंगावधान राखून एक मुलगी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिने पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांची तातडीची कारवाई

मुलीने सांगितलेल्या पत्त्यावर पोलिसांनी छापा टाकला. तिथे कोंडून ठेवलेल्या उर्वरित तीन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं आणि घटनास्थळावरूनच सर्व आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपींची चौकशी केली असता या गुन्ह्या संदर्भातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

वैद्यकीय तपासणी आणि पुढील तपास सुरू

पोलिसांनी सर्व पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करून घेतलीये. अटक केलेल्या दोन अल्पवयीन आरोपींवर बाल न्याय कायद्यानुसार (जुवेनाईल ॲक्ट) कारवाई केली जातेय. या संपूर्ण घटनेचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं जाईल असं पोलिसांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर बंदी,काय आहे कारण?

Wednesday Horoscope: कामात संधी, आनंदाची बातमी; या 5 राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा बुधवारचं राशीभविष्य

मनसेच्या कार्यालयात तुंबळ हाणामारी; राऊत यांना बेदम मारहाण, तालुकाध्यक्षावरही हल्ला

Chakan MIDC: चाकण MIDCमध्ये जीवघेणे खड्डे, वर्षभरात ३९९ जणांचा बळी, जबाबदार कोण?

Health Tips: चालताना पायाचे तळवे का दुखतात? काय आहेत कारणं?

SCROLL FOR NEXT