pune  Saam tv
क्राईम

Pune Firing : पुण्यात चाललंय काय? शहरात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार, परिसरात खळबळ

Pune Firing News Update : पुण्यात काल मंगळवारी सायंकाळी बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. त्यानंतर आज बुधवारी पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, पुणे

पुणे : पुण्यात काल मंगळवारी सायंकाळी बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. त्यानंतर आज बुधवारी पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये ही गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सलग दोन दिवसाच्या गोळीबाराच्या घटनेनेमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

पुण्यात काल संध्याकाळी बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. काल सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरुम समोरील धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी गोळीबाराची घटना घडली. पुण्यातील हडपसरमध्ये बुधवारी गोळीबाराची घटना घडली.

पुण्यातील हडपसरमधील शेवाळवाडीतील नंदिनी सोसायटीसमोर ही गोळीबाराची घटना घडली. व्यावसायिक वादातून एका माजी सैनिकाने गोळीबार केला. माजी सैनिक जयवंत खलाटे यांच्यावर आरोपी माजी सैनिक सुधीर शेडगे या आरोपीने गोळीबार केला. खलाटे आणि शेडगे दोघेही माजी सैनिक आहेत. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक धीरज दिनेशचंद्र आरगडे यांच्यावर स्विगीचे वस्त्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळबार करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी डोक्यात हेल्मेट घातले होते. या दोघांनी पिस्तूल काढून दोन वेळा फार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळीबार न झाल्याने दोन्ही आरोपी पळून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : धक्कादायक! बदलापूर लोकलवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्यावर वार, रक्ताने तोंड माखलं

Maharashtra Politics : संजय राऊत ठाकरेंची शिवसेना सोडणार? भाजपच्या दाव्यानं राज्यात खळबळ

Social media KYC India: फेसबुक, इन्स्टा अकाऊंट बनवण्यासाठी आधार कार्ड लागणार? सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय

Crime News: मामीवर भाच्याचा एकतर्फी जीव जडला, मामाला शेतात अतिबिअर पाजली अन् कायमचा संपवला, असं फुटलं बिंग?

Lockdown : घाबरू नका, देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही, सरकारकडून महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT