नितीन पाटणकर साम टीव्ही, पुणे
पुणे (Pune) शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वर चढत आहे. आता पुन्हा एकदा भर रस्त्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर (Fergusson College Road) कोयत्याने हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण असल्याचं समोर येत आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत चाललेली हाणामारी पुणेकरांनी पाहिली आहे. (Latest Crime News)
पुण्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. दोन व्यक्तींच्या झालेल्या भांडणात कोयत्याचा वापर केल्याचं समोर आलं आहे. पुणे शहरामध्ये भर रस्त्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी (Crime News) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात चाललंत तरी काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्या पुण्यामध्ये भांडणांत सर्रासपणे कोयत्याचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी देखील कोयत्याने हाणामारी केली जात (Pune Crime) आहे. तरीदेखील पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होतंय का, असा सवाल पुणेकरांना पडला आहे. दोन व्यक्तींच्या झालेल्या भांडणात कोयत्याचा वापर केल्याचं समोर आलं आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून झालेल्या भांडणांमध्ये देखील कोयत्याचा वापर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरतोय. पुण्यात वाहनांची तोडफोड, कोयत्याने हाणामारी झाल्याचे प्रकार सर्रासपणे समोर येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घटना गर्दीच्या ठिकाणी, शाळकरी महाविद्यालयीन मुलांकडून (Fight With Koyata) घडत आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते दिसत आहेत. यावर अंकुश बसविण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय.
अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचं काम त्यांच्या पालकांचं देखील आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर त्या मुलांच्या पालकांवर कारवाई होण्याची शक्यता ( Fergusson College Road) आहे," अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली होती.
गोऱ्हे बुद्रूक परिसरात ९ मार्च रोजी कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली होती.यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. या घटनेमध्ये तिघेजण जखमी झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.