fake currency notes worth rs 2 lakh seized 1 arrested in navi mumbai  Saam Digital
क्राईम

नवी मुंबई : नववी शिकलेल्या युवकाचा बनावट नोटांचा छापखाना, पाेलिसांच्या धाडीत 2 लाखांच्या नाेटा जप्त

Fake Currency : तळोजा पोलिस ठाण्यात प्रफुल्ल पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे बनावट नाेटा चलनात किती आल्या याचा शाेध पाेलिस घेताहेत.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

पैसे कमाविण्याचा शॉर्टकट मार्ग काढत नवी मुंबईतील तळोजा येथे राहणाऱ्या प्रफुल्ल पाटील या युवकाने समाज माध्यमातून व्हिडिओ पाहून चक्क बनावट नोटांचा छापखाना काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित युवकाचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झाले असून पाेलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार प्रफुल्ल पाटील हा घरच्यांपासून वेगळा एकटा राहत होता. नववी पर्यंत शिकलेल्या प्रफुल्ल याला पैशाची चणचण भासत असल्याने त्याने समाज माध्यमातून बनावट नोटा बनविण्याची माहिती घेतली.

या माहितीच्या आधारे नोटा बनवण्यासाठी कॉटन पेपर, प्रिंटर, स्कॅनर आणि नोटेवर चिकटवण्यासाठी हिरव्या रंगाची प्लास्टिकची पट्टी या साहित्यांची खरेदी केली. याद्वारे प्रफुल्लने 10, 20, 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या होत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात देखील आणल्या होत्या. मात्र त्याच्या मार्फत वापरात येणाऱ्या नोटा बनावट असल्याचा संशय काही नागरिकांना आल्याने त्यांनी पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचत प्रफुल्ल पाटील याला पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोट बनविण्याचे साहित्य आणि 2 लाख 3 हजार किंमतीच्या बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात प्रफुल्ल पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT