Nashik Crime Saam Tv
क्राईम

Nashik Crime: सोशल मीडियावरून मैत्री, महिलेने उकळले ५५ लाख , फसवणूक झाल्याने कृषी अधिकाऱ्याने संपवलं आयुष्य

Nashik Police: नाशिकमध्ये कृषी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. फेसबुकवर मैत्री झालेल्या महिलेने त्यांना ५५ लाख रुपयांचा गंडा घातला. त्यानंतर या कृषी अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली.

Priya More

नाशिकमध्ये कृषी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकवरून मैत्री झालेल्या महिलेने या कृषी अधिकाऱ्याची मोठी फसवणूक केली. या महिलेने तब्बल ५५ लाखांचा गंडा घातला. त्यानंतर चिंतेत येऊन या कृषी अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास नाशिक पोलिस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील असं या आत्महत्या केलेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. ते जव्हार पंचायत समितीचे कृषी अधिकारी होते आणि नाशिकमध्ये राहत होते. प्रशांत पाटील यांची फेसबुकवरून एका महिलेशी ओळख झाली. ते नेहमी फेसबुकवर गप्पा मारायचे. या महिलेने या कृषी अधिकाऱ्याला ५५ लाख रुपयांचा गंडा घातला. त्यानंतर प्रशांत पाटील यांनी नाशिक येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

फेसबूक फ्रेंड महिलेने ऑइल स्वस्तात खरेदी करून महागात विक्रीचे अमिष दिले होते. प्रशांत पाटील यांनी ३० तोळे दागिने विकून कर्ज काढून रक्कम जमा केली होती. या महिलेच्या नादात त्यांनी तब्बल ५५ लाख रुपये गमावले. ऐवढे पैसे गमावल्याचे लक्षात येताच त्यांनी चिंतेत येऊन आयुष्य संपवले. नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात प्रशांत पाटील यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सायबर पोलिस प्रशांत पाटील यांची फसवणूक करणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.

दरम्यान, मुंबईमध्ये देखील अशीच घटना घडली होती. सीए तरुणाने आत्महत्या केली. या सीए तरुणाची फेसबुकवरून एका तरुणीसोबत ओळख झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांमध्ये शरीरसंबंध झाले. या शरीरसंबंधाचे व्हिडीओ काढून तरुणीने त्याला व्हायरल करण्याची धमकी दिली. तिने त्याच्याकडून तब्बल ३ कोटी रुपये उकाळले. तरुणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार; विरोधकांचं टेन्शन वाढणार,VIDEO

Shukra Gochar 2025: पाच राशींचं नशीब पालटणार; छप्परफाड होणार कमाई, मिळणार प्रेम, घर, पैसा अन् गाडी

Lightning Strike : वीज कडाडली अन् झाला घात; बैल चारण्यासाठी गेलेल्या तरूणाचा मृत्यू, दोघे जखमी

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधन होण्याआधी लाडक्या बहिणींना झटका? महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Live News Update: पुण्यात मनसेचे आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन

SCROLL FOR NEXT