Chhatrapati Sambhajinagar News Saam Tv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar News: गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या १९ वर्षीय इंजीनिअरिंग विद्यार्थिनीचा पर्दाफाश, सापडला लाखोंचा ऐवज

Engineering Student Running Fetal Diagnostic Center: छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरात एक उच्चशिक्षीत तरूणी तिच्या फ्लॅटमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करीत होती. मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई करत तिचा पर्दाफाश केला आहे.

Rohini Gudaghe

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शहरात एक उच्चशिक्षीत तरूणी तिच्या फ्लॅटमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करीत होती. मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई करत तिचा पर्दाफाश केला आहे. शहरातील गारखेडा भागामध्ये हे गर्भनिदान चाचणी सेंटर सुरू होते. सापळा रचून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली आहे.

अवैधरित्या गर्भनिदान करणाऱ्या केंद्रावर आरोग्य विभागाने छापा टाकला आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका रहिवाश फ्लॅटमध्ये गर्भनिदान चाचणीचा धंदा सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे इंजीनिअरिंग करणारी तरुणी हे गर्भलिंग निदान केंद्र चालवत (Crime News) होती. यावेळी महापालिकेच्या पथकाला 12 लाख 78 हजारांची अधिक रक्कम मिळून आली आहे. सोबतच गर्भलिंग निदान करण्याचं साहित्य देखील मिळून आलं आहे.

ही कारवाई रविवारी दुपारी केली गेली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लॅटमध्ये गुपचूप हा गोरखधंदा सुरू होता. त्यांनी या तरूणीला रंगेहाथ पकडलं आहे. तसंच तिथून त्यांना गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरले जाणारे (Fetal Diagnostic Center In Garkheda) लॅपटॉप, टॅब, सोनोग्राफीसाठी वापरले जाणारे स्कॅनर, कापूस, लोशन हे साहित्य मिळाले आहे. त्याचप्रमाणे मोठी रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरूणी तिच्या मावस भावाकडून गर्भलिंग निदान चाचणी करण्याचं शिकलेली आहे. विद्यार्थिनीचा मावस भाऊ वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणामध्ये जानेवारी (Chhatrapati Sambhajinagar News) महिन्यात अटक केली होती. तेव्हापासून तो तुरूंगात आहे. आरोपी तरूणी आणि तिच्या भावात सतत आहे. तसंच अनेकदा ही तरूणी तुरूंगात जाऊन तिच्या भावाला भेटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : इटलीमध्ये भीषण अपघात! ट्रक आणि कारची जोरदार धडक, ४ भारतीयांचा मृत्यू

Coldref Syrup Ban: कफ सिरपनं घेतला 18 मुलांचा बळी, राज्य सरकारनं मोठा निर्णय

Road Cum Rail Tunnel Project: भन्नाट! एकाच बोगद्यातून धावणार कार, बस अन् रेल्वे; 'या' 3 ठिकाणी होणारे नवे महामार्ग

Gautami Patil: मंत्री चंद्रकांत पाटीलांच्या हस्तक्षेप आणि गौतमी पाटीलला क्लीन चिट; नेमकं काय घडलं?

Thane : ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार; काय आहे सरकारचा प्लान?

SCROLL FOR NEXT