A 26-year-old woman from Mehekar in Buldhana died by suicide allegedly due to dowry harassment; police have arrested her husband. saam tv
क्राईम

हुंड्यासाठी छळ; २६ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, 3 वर्षांच्या चिमूरड्यासमोरच उचलले टोकाचे पाऊल

26 Year Old Woman End Life Due To Dowry Harassment In Maharashtra: बुलढाण्यात हुंड्याच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल, पतीला अटक.

Omkar Sonawane

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: हुंड्यासाठी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून मेहकर येथील एका २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी मेरत असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत वैष्णवीचे वडील रतन पागोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

१० लाखांच्या हुंड्यासाठी होता दबाव

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा विवाह मेहेरमधील मेरत परिवारात झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. चारचाकी वाहन खरेदी करणे, कर्जाचे हप्ते भरणे आणि इतर कारणांसाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन ये, यासाठी वैष्णवीवर सातत्याने मानसिक व शारीरिक दबाव टाकला जात होता.

घरात ३ वर्षांचा मुलगा असताना उचलले टोकाचे पाऊल

सासरच्या जाचाला कंटाळून अखेर वैष्णवीने घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, वैष्णवीने जेव्हा हे टोकाचे पाऊल उचलले, तेव्हा तिचा तीन वर्षांचा मुलगा 'आयांश' घरातच होता. आईच्या आत्महत्येमुळे हा निष्पाप चिमुरडा आता मातृछत्राला मुकला असून, या घटनेमुळे संपूर्ण मेहकर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

पतीला २ दिवसांची पोलीस कोठडी

या घटनेनंतर मृत वैष्णवीचे वडील रतन पागोरे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे मेहकर पोलिसांनी मृत वैष्णवीचा पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी असलेल्या पतीला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton One Piece Designs: पावसाळ्यात स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ युनिक कॉटन वन पीस डिझाइन्स

ATM मधून पैसे काढताना 'या' ८ चुका कधीही करू नका; नाहीतर बुडतील तुमचे पैसे

Sneezing facts: शिंका आल्यावर खरंच हृदयाचे ठोके थांबतात?

Monsoon fridge temperature: पावसाळ्यात फ्रिजचं तापमान किती असलं पाहिजे?

Kankavli Fort : कणकवलीपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला, पाहाल हिरवागार निसर्ग अन् इतिहासाचा सुंदर संगम

SCROLL FOR NEXT