Dombivli Crime
Dombivli Crime Saam Tv
क्राईम

Dombivli Crime : कचोरेच्या गावदेवी मंदिरातील पादुका चोरणारे गजाआड; रिक्षाच्या नंबरने लागला तिन्ही चोरट्याचा तपास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अभिजीत देशमुख,कल्याण )

Dombivli Police Arrested Thieves Crime :

कल्याण पत्रिपुल कचोरे येथील ६० फुटी रस्त्यावरील गावदेवी मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणाचा तपास टिळकनगर पोलिसांकडे होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ३ चोरट्यांच्या नवी मुंबईच्या तुर्भे झोपडपट्टीतून अटक केलीय. राजेश उर्फ राजू वंजारे , कैलास निशाद , आणि फारूख अली मोहम्मद हनीफ शेख, अशी अटक आरोपींची नावे आहेत. (Latest News)

पादूका चोरी केल्यानंतर पळण्यासाठी चोरट्यांनी एका रिक्षाचा वापर केला होता. या रिक्षाचा नंबर पोलिसांच्या हाती लागला. त्या रिक्षाच्या नंबर आधारे या चोरट्यांपर्यंत पोलीस पोहचले.अटक केलेल्या आरोपींकडून एक किलो वजनाच्या चांदीच्या ३० हजार रूपये किंमतीच्या पादुका हस्तगत करण्यात आल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कचोरे गावाबाहेर रेल्वे लाईनला लागून ९० फुटी रस्त्यावर गावदेवी मातेचे मंदिर आहे. शुक्रवारी २२ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या मंदिरात भक्त म्हणून दोन चोरटे शिरले. त्यांनी देवीची पूजा करत देवीच्या मूर्ती समोरील चांदीचा पादुका चोरून नेल्या. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा हा प्रकार कैद झाला होता.

पादुका चोरीला गेल्याचे लक्षात येताच या प्रकरणी ग्रामस्थांनी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता चोरटे रिक्षातून पळून गेल्याचे समोर आले. या रिक्षाच्या नंबरवरून चोरट्यांचा शोध सुरू केला. तिघेही नवी मुंबई येथील तुर्भे झोपडपट्टीत लपल्याची माहिती कळताच या परिसरात सापळा रचत पळून जाण्याचा बेतात असणाऱ्या तिघांना अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facts About Kingfisher: किंगफिशर बद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला करतील आश्चर्यचकित

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क! मतदानाचं महत्व पटवून देत म्हणाला...

Lychee Side Effects: मधुमेह असणाऱ्यांनी लिची का खाऊ नये?

Face Serum at Home : घरच्याघरी बनवा इफेक्टीव Face Serum; कमी खर्चात येईल सेलिब्रीटी सारखा ग्लो

Farmer Success Story : चवळी लागवडीतून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न; बिलोली येथील शेतकऱ्याचे योग्य नियोजन

SCROLL FOR NEXT