Dombivli News: धक्कादायक! डोंबिवली MIDC मधील दोन कंपन्यात २ कामगारांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Dombivli Breaking News: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील दोन विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मानपाडा पोलीस ठाण्याच्या दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे .
Dombivli Crime News
Dombivli Crime Newssaam tv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. १५ मार्च २०२४

Dombivli MIDC News:

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील दोन विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यापैकी एका कंपनीत केमिकलचा ब्लास्ट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या कंपनीत अचानक उष्णतेचा त्रास झाल्याने कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून कामगारांच्या सुरक्षतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवली एमआयडीसी फेज वनमध्ये असलेल्या कलिक्स केमिकल्स फार्मासिटिकल लिमिटेड या कंपनीत आज दुपारी केमिकलचा ब्लास्ट झाला. या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संतोष खांबे असे या मृत कामगाराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही आग काही क्षणात आटोक्यात आणली.

दुसऱ्या घटनेत कल्याणशील रोडवरील नवरंग नाक्यावर असलेल्या एका श्रीजी लाईफस्टाईल कंपनीत अचानक झालेल्या हिटचा त्रास होऊन पवन सिंग या कामगाराला उलट्या झाल्या. त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पवन सिंग यांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे .

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dombivli Crime News
Loksabha Election: पंकजा मुंडे यांच्याविरोधात नवे आव्हान; बीडमध्ये यशवंत सेना उतरणार लोकसभेच्या मैदानात

दरम्यान, याबाबत भाजपाचे पदाधिकारी मोरेश्वर भोईर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशा घटना घडल्यावर कंपनी सुरुवातीला नुकसान भरपाई देणार असं बोलते. नंतर वेळ निघून गेल्यावर ते वेळ काढूपणा करतात. एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही उपाययोजना केल्या जात नाहीत, म्हणत कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबत कोणतेही उपाययोजना न करता कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपन्यांवर कारवाई करा अशी मागणी केली. (Latest Marathi News)

Dombivli Crime News
Eknath Khadse News: अखेर ठरलं! रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढत होणार का? एकनाथ खडसेंनी स्पष्टचं सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com