आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उतरवण्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली असतानाच दुसरीकडे आता धनगर समाज मात्र आक्रमक झाला आहे. बीडमधून यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर बांधव लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बीडमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यशवंत सेनेची बीडमध्ये (Beed) नुकतीच बैठक पार पडली पडली. यामध्ये धनगर समाजाचे नेते तथा आरक्षणासाठी बीड, चौंडी, मुंबईत आंदोलन करणारे बाळासाहेब दोडतले यांना आम्ही उभे करणार आहोत, असा निर्धार धनगर बांधवांनी केला आहे. भाजपने धनगर बांधवांवर अन्याय केलाय. त्यांनी अवघ्या पाच जागांवर धनगर समाजाचे उमेदवार उभे केलेत.
तसेच ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार नाही, अशाच ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले आहेत. त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दादेखील त्यांनी सोडला नाही. तर दुसरीकडे मुंडे भगिनींना आतापर्यंत आम्ही निवडून दिले, मात्र त्यांनी देखील संसदेत धनगर बांधवांचा मुद्दा लावून धरला नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे भाजप आणि मुंडे भगिनींविरोधात धनगर बांधवांनी एल्गार पुकारला असून संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मात्र एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत. असे देखील या बैठकीतून धनगर बांधवांनी जाहीर केले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.