Dombivli Crime News saam tv
क्राईम

Dombivli Crime: धक्कादायक! झोपेची गोळी न दिल्याने वाद , मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Mumbai Latest News: खोणी पलावामधील एका मेडिकलमध्ये झोपेची गोळी न दिल्याने दोघा जणांनी मेडिकल चालकाला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, ता. २७ जून २०२४

झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीच्या खोणी पलावामध्ये घडला. याप्रकरणी डोंबिवली मेडिकल केमिस्ट संघटनेने आक्रमक भूमिका घेत मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून अपघात, सुरक्षारक्षकांकडून मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आलेली डोंबिवली जवळील खोणी पलावा ही हाय प्रोफाइल सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खोणी पलावामधील एका मेडिकलमध्ये झोपेची गोळी न दिल्याने दोघा जणांनी मेडिकल चालकाला बेदम मारहाण केली आहे.

मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून अशा प्रवूत्तींवर वचक बसवावा अशी मागणी डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

खोणी पलावा येथील संजीवनी मेडिकलमध्ये मंगळवारी रात्री साडे दहा वाजता एक तरुण आला. त्याने झोपेची गोळी मागितली. मात्र डॉक्टरांची प्रिस्किप्शन नसल्याने मेडिकल चालकाने गोळी देण्यास नकार दिला. यावरुनच या तरुणाने आपल्या काही साथिदारांसोबत मेडिकलमधील कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून दुकान बाहेर खेचत नेऊन मारहाण केली. मानपाडा पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, नंतर UPSC केली क्रॅक; निर्भीड IPS ऑफिसर विकास वैभव यांचा प्रवास

Wednesday Horoscope : वाटे वाटेवर अडचणीचा अनुभव यईल; ५ राशींच्या लोकांची देव परीक्षा घेणार, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Shukra Gochar: 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; 1 वर्षानंतर शुक्र करणार सूर्याच्या घरात प्रवेश

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

SCROLL FOR NEXT