Washim Crime news Saam Tv
क्राईम

Crime: दिवाळीत रक्तरंजित थरार! घरगुती वादातून चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू तर चौघे गंभीर

Washim Crime News: वाशिममध्ये ऐन दिवाळीत हत्याकांडाची भयंकर घटना घडली. घरगुती वादातून एकमेकांवर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

Summary -

  • वाशिमच्या आमखेडा गावात घरगुती वादातून चाकू हल्ला

  • अविनाश चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला

  • या हल्ल्यात चौघे जण गंभीर जखमी झालेत

  • नातेसंबंधांवरून झालेल्या वादातून हल्ल्याची घटना

मनोज जयस्वाल, वाशिम

वाशिममध्ये दिवाळीमध्ये रक्तरंजित थराराची घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एकमेकांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना वाशिमच्या आमखेडामध्ये घडली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या आमखेडा येथे पारधी समाजामध्ये घरगुती नातेसंबंधांवरून टोकाचा वाद झाला. सुरूवातीला शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर एकमेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या वादातून गंभीर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात अविनाश निमिचंद चव्हाण यांच्या मानेवर धारदार चाकूने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यात संदेश चव्हाण, स्वाती चव्हाण, गजानन चव्हाण आणि आकाश चव्हाण यांच्यावर देखील चाकू हल्ला झाल्याने हे चौघे जण देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

नातेसंबंधातून हा हल्ला झाला असून विविध गावातील पारधी समाजातील लोकांनीच हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर मोटर सायकल सोडून घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेचा तपास जऊळका पोलिस करत आहेत.c

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT