Dhule News  Saam Digital
क्राईम

Dhule News : क्रुरतेचा कळस! जन्मदात्या बापानेच ३ वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात घातलं दांडकं, मृतदेह घरामागे पुरला, पण समजलं कसं?

Dhule Crime News : जन्मदात्या बापानेच डोक्यात दांडके घालून तीन वर्षांच्या मुलीचा खून करून तिला घरामागील जागेत खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नांदर्डे येथे उघडकीस आली आहे.

Sandeep Gawade

भूषण अहिरे

जन्मदात्या बापानेच डोक्यात दांडके घालून तीन वर्षांच्या मुलीचा खून करून तिला घरामागील जागेत खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नांदर्डे येथे उघडकीस आली आहे. खुनी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुरलेल्या मुलीचा मृतदेह देखील पोलिसांनी बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

खुनी बापाच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई शिरपूर पोलीस करीत असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खुनाची घटना ६ जूनला शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावात घडली होती, पूजा अनिल पावरा (वय ३) असे मृत मुलीचे नाव आहे. अनिल गुलाब पावरा याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला आहे. तिला अनिल पावरा सांभाळत होता दरम्यान अनिल पवार याने दुसरं लग्न केलं, मात्र त्याची दुसरी बायकोही त्याला सोडून निघून गेली. त्यामुळे त्याला नैराश्य आलं होतं.

दरम्यांन ६ जूनला रात्री दारूच्या नशेत असलेल्या अनिल पावरा याने मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केला. ६ जूनला सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरामागे जमिनीत खड्ड्यात पुरला. दरम्यान शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना पूजा दिसत नसल्यामुळे हे बिंग फुटलं. खुनी बापानेच स्वतः या सर्व कृत्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : अंगाला स्पर्श केल्याचा इन्फ्लुएन्सरचा आरोप, व्हिडिओ व्हायरल झाल्याने तरण नैराश्यात, घाबरून आयुष्य संपवलं

Skin Care : चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? मग, क्लिन त्वचेसाठी घरच्या घरी बनवा अँटी एक्ने टोनर

Original Cotton Saree: ओरिजनल कॉटन साडी कशी ओळखायची? या आहेत लेटेस्ट 5 साडी डिझाईन्स

Maharashtra Live News Update: पुण्यातील नामांकित क्लिनिकमधून मृत महिलेची बॉडी गायब

Kalyan Crime News: शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना|Video Viral

SCROLL FOR NEXT