crime Saam tv
क्राईम

Dhule Crime : जनावरांच्या चाऱ्यात लपवून दारूची तस्करी; पोलिसांकडून पर्दाफाश, लाखोंचा साठा जप्त

Dhule Crime News : शिरपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सापळा रचत अवैधपणे जनावरांच्या चाऱ्यातून बिअरची वाहतूक करणाऱ्यांकडून बिअरचा साठा हस्तगत केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Dhule :

धुळे जिल्ल्ह्यात अवैध पद्धतीने दारूची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. जनावरांच्या चाऱ्यात लपवून अवैधपणे बिअरचे बॉक्स वाहून नेले जात होते. यावर शिरपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सापळा रचत अवैधपणे जनावरांच्या चाऱ्यातून बिअरची वाहतूक करणाऱ्यांकडून बिअरचा साठा हस्तगत केला आहे.

शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाकडून वाहनात अवैधपणे बियरची वाहतूक केली जात होती. गुप्त माहितीदारामार्फत शिरपूर शहर पोलीस अधिकाऱ्यांना ही माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलिसांनी सापळा रचला आणि कारवाई केली.

कारवाईवेळी पोलिसांनी वाहन चालकास वाहन थांबवण्याचा इशारा केला होता. मात्र पोलिसांना पाहून वाहन चालकाने आणखीन वेगाने वाहन पळवले. त्यानंतर पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला.

काळी अंतरावर पोलिसांनी हा ट्रक आडवला. त्यावेळी ट्रक थांबवून वाहन चालकाने लगेचच पळ काढला. पोलिसांनी वाहन चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.

पोलिसांनी संबंधित वाहनातून जवळपास 70 बिअरचे बॉक्स हस्तगत केले आहेत. त्यामध्ये जवळपास एक लाख 82 हजार रुपयांपेक्षा जास्तीची बियर पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याचबरोबर एकंदरीत या कारवाईदरम्यान पोलिसांनी 16 लाख 82 हजाराहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पुढील कारवाई शिरपूर शहर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

SCROLL FOR NEXT