Crime News: खळबळजनक! समोश्यांमध्ये आढळले कंडोम, गुटखा आणि खडे; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime: ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
Crime News
Crime NewsSaam Tv

सागर आव्हाड साम टीव्ही, पुणे

Pune Crime News

ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी (Pune Crime) दिली. पुण्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.  (Latest Marathi News)

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एका उपकंत्राटदार कंपनीच्या दोन कामगारांचा समावेश आहे. ज्यांना समोसे पुरवठ्याचे कंत्राट मिळाले होते. तसेच ते भेसळ केल्याप्रकरणी यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या अशा अन्य फर्मचे (Crime News) तीन भागीदार आहेत. कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मकडे ऑटोमोबाईल कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचे कंत्राट आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या फर्मने मनोहर एंटरप्रायझेस नावाच्या दुसऱ्या उपकंत्राटदार कंपनीला समोसे पुरवण्याचे कंत्राट दिले होते. शनिवारी ऑटोमोबाईल कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे (Stone Found in Samosa) सापडले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना संपर्क साधला.

त्यानंतर संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आपण समोस्यामध्ये झुरळं, किंवा किडे सापडल्याच्या घटना ऐकल्या (Pune News) होत्या. परंतु समोश्यांमध्ये (Samosa) कंडोम, गुटखा आणि खडे आढळणे ही खूप गंभीर बाब आहे. त्यामुळे याप्रकरणाची दखल गांभीर्याने घेतली जात आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Crime News
Bikaner Samosa Viral Video : बिकानेरच्या सामोशात आढळला मेलेला झुरळ; बेलापूर सीबीडीमधील धक्कादायक प्रकार

समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळल्यानंतर ( Condom Gutkha and Stone Found in Samosa) संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारांमुळे आता बाहेरील खाद्यपदार्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

Crime News
Samosa Video: समोसा बनवण्याचे पीठ पायाने तुडवले; उल्हासनगरमधील किळसवाणा प्रकार, Video पाहून अनेकांचा संताप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com