Samosa Video: समोसा बनवण्याचे पीठ पायाने तुडवले; उल्हासनगरमधील किळसवाणा प्रकार, Video पाहून अनेकांचा संताप

Samosa Video Viral: उल्हासनगरमध्ये एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. समोसे बनवण्याचे पीठ पायाने तुडवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Samosa Video: समोसा बनवण्याचे पीठ पायाने तुडवले; उल्हासनगरमधील किळसवाणा प्रकार, Video पाहून अनेकांचा संताप

अजय दुधाणे

Latest Viral News

समोसा हा अनेकांच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे. आपण आवडीने खातो, परंतु तो कसा बनवला जातो? याचा कधी जास्त विचार करत नाही. बनवताना स्वच्छता असते का, तो कोण आणि कुठे बनवतं याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. अन्यथा (Samosa Video Viral) आपल्याला अनेकदा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. (Latest Marathi News)

उल्हासनगरच्या कॅप नंबर ४च्या आशेळेपाडा भागात हरिओम स्वीट नावाच्या दुकानात धक्कादायक प्रकार घडला आहे. समोसे बनवण्याचे पीठ पायानं तुडवले जात असल्याचं समोर आलं आहे. ही घटना पाहून तुम्ही भविष्यात पुन्हा समोसे खायचा विचार देखील (Disgusting Video) करणार नाही. उल्हासनगरमध्ये हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे प्रकरण?

उल्हासनगरच्या कॅप नंबर ४च्या आशेळेपाडा भागात गेल्या 15 ते 20 वर्षांपासून हरिओम स्वीट हे दुकान आहे. या मिठाईच्या दुकानात कारागीर समोसे बनविण्यासाठी लागणारं पीठ (Ulhasnagar News) पायानं तुडवत असल्याचं येथे नेहमी येणाऱ्या एका ग्राहकानं पाहिलं. हे दृश्य पाहिल्यानंतर ग्राहकाला मोठा धक्का बसला.

या ग्राहकाने मोबाईलमध्ये या किळसवाण्या प्रकाराचं रेकॉर्डिंग केलं. हा व्हिडिओ (Video Viral From Ulhasnagar) संपूर्ण परिसरात व्हायरल झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मिठाईच्या दुकानावर धडक देत इथल्या दुकान मालकाला याचा जाब विचारला आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाहेरील खाद्यपदार्थ खायचे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Samosa Video: समोसा बनवण्याचे पीठ पायाने तुडवले; उल्हासनगरमधील किळसवाणा प्रकार, Video पाहून अनेकांचा संताप
Bikaner Samosa Viral Video : बिकानेरच्या सामोशात आढळला मेलेला झुरळ; बेलापूर सीबीडीमधील धक्कादायक प्रकार

यापूर्वीची घटना

याअगोदर नवी मुंबईच्या बेलापूर सीबीडीतून धक्कादायक प्रकार समोर आला होता. बेलापूर सीबीडीमध्ये एका खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानातील समोशामध्ये मेलेला झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Viral News) होता. बेलापूर सीबीडी परिसरात जागोजागी समोसे, वडापावसारख्या खाद्यपदार्थांचे गाडे आहेत.

पत्रकार प्रिया मोरेने शुक्रवारी सकाळी बिकानेरच्या दुकानातून समोसे मागवले होते. समोसे खाण्यास सुरुवात करताच त्यात मेलेला झुरुळ आढळला होता. समोशात मेलेला झुरळ आढळल्यानंतर बिकानेर दुकानात जाऊन तिने संताप व्यक्त केला. समोशात मेलेला झुरळ असल्याचं मान्य करत बिकानेर दुकानदारानं जाऊ (Viral Video) द्या, सोडून द्या, म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.

Samosa Video: समोसा बनवण्याचे पीठ पायाने तुडवले; उल्हासनगरमधील किळसवाणा प्रकार, Video पाहून अनेकांचा संताप
Farah Khan Shopping On Street: बापरे, ट्रायपॉड इतका महाग!, लक्झरी ब्रँड सोडून रस्त्यावर शॉपिंग करताना स्पॉट झाली फराह खान, Video Viral

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com