Delhi Crime Saam Tv
क्राईम

Crime: १९ वर्षीय तरुणीला बिल्डिंगच्या टेरेसवरून फेकलं; तरुणाचं धक्कादायक कृत्य, बहिणीनं सगळं खरं खरं सांगितलं

Delhi Crime: दिल्लीमध्ये भयंकर घटना घडली. १९ वर्षीय नेहाला तिच्याच ओळखीतील तरुणान पाचव्या मजल्यावरील टेरेसवरून खाली फेकून दिलं. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नेहाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Priya More

दिल्लीमध्ये ५ व्या मजल्यावरून फेकून एका तरुणीची हत्या करण्यात आली. ही घटना दिल्लीतील ज्योती नगरमध्ये घडली. तौफिक नावाच्या तरुणाने १९ वर्षीय नेहाला पाचव्या मजल्यावरून ढकलून दिलं. दोघांचे एकमेकांवर प्रेम होत अशी माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या नेहाला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दिल्लीच्या अशोकनगरमध्ये राहणाऱ्या नेहाला भेटण्यासाठी तौफिक नावाचा तरूण सोमवारी सकाळी आला होता. तौफिक बुरखा घालून आला होता. त्याला भेटण्यासाठी नेहा बिल्डिंगच्या टेरेसवर गेली. दोघांमध्ये काही कारणवरून वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात तौफिकने नेहाला पाचव्या मजल्याच्या टेरेसवरून खाली फेकून दिलं. रस्त्यावर पडून नेहा गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपी तौफिकने बुरखा घालून तिथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या नेहाला कुटुंबीयांनी तात्काळ जीटीबी रुग्णालयात दाखल केले. पण नेहाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा हिंदू कुटुंबातील होती. ती अशोक नगर परिसरात कुटुंबासह राहत होती. नेहाच्या कुटुंबात तिचे आईवडील, दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. बारावी पास झाल्यानंतर नेहा एका कंपनीत काम करत होती. नेहाचा मित्र तौफिक देखील न्यू अशोक नगरमध्ये भाड्याने राहतो आणि तो किराणा दुकानात काम करतो. आरोपी तौफिक हा मूळचा मुरादाबादचा आहे. नेहा आणि तौफिक एकमेकांना ३ वर्षांपासून ओळखतात. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली, नंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले. आरोपी अनेकदा नेहाच्या घरी येत होता. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे त्यांनी बोलणे बंद केले होते.

अशी देखील माहिती समोर आली आहे की, नेहा तौफिकला गेल्या ३ वर्षांपासून ओळखत होती आणि ती त्याला भाऊ म्हणत होती. ती त्याला राखी देखील बांधत होती. परंतु तौफिक नेहावर प्रेम करत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो नेहाशी लग्न करण्याचा हट्ट करत होता. जेव्हा नेहाने लग्नाला विरोध केला तर त्याने तिची हत्या केली. आरोपी तौफिकला तात्काळ अटक करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नेहाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

या घटनेनंतर नेहाच्या बहिणीने एक धक्कादायक सत्य सांगितलं. तौफिक गेल्या एक महिन्यापासून लग्नासाठी नेहाला त्रास देत होता. ती म्हणाली की,'तो गेल्या एक महिन्यापासून माझ्या बहिणीला त्रास देत होता. लग्नासाठी दबाव आणत होता. जेव्हा माझ्या बहिणीने नकार दिला तर त्याने तिची हत्या केली. आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की तो असं करेल. मी माझ्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला ढकललं आणि नंतर त्याने नेहाला टेरेसवरून ढकललं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT