Crime: विदेशी पर्यटक महिलेवर बलात्कार, कॅफेतील पार्टीत भयंकर घडलं

Udaipur Crime: राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका विदेशी महिला पर्यटकावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Crime: विदेशी पर्यटक महिलेवर बलात्कार, कॅफेतील पार्टीत भयंकर घडलं
Udaipur CrimeSaam Tv
Published On

राजस्थानच्या उदयपूरमध्ये फ्रान्सवरून आलेल्या पर्यटक महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने या महिलेवर बलात्कार करण्यापूर्वी एका कॅफेमध्ये तिच्यासोबत पार्टी केली. त्यानंतर तिला आमिष दाखवून आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे जयपूर हादरले असून महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जयपूर शहरातील बडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. सोमवारी रात्री उशिरा पीडित महिला पर्यटक टायगर हिल येथील एका कॅफेमध्ये पार्टीसाठी गेली होती. पार्टी झाल्यानंतर एका तरुणाने तिला जबरदस्ती कॅफेबाहेर नेलं. त्यानंतर तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

Crime: विदेशी पर्यटक महिलेवर बलात्कार, कॅफेतील पार्टीत भयंकर घडलं
BJP MLA Crime: भाजप आमदाराकडून बँक मॅनेजरला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

महिला पर्यटकाची प्रकृती बिघडली असून तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बडगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Crime: विदेशी पर्यटक महिलेवर बलात्कार, कॅफेतील पार्टीत भयंकर घडलं
Mumbai Crime: दारुसाठी पैसे दिले नाही, रागाच्या भरात नवऱ्याने घेतला बायकोचा जीव; मुंबई हादरली

पोलिस अधिकारी पूरण सिंह म्हणाले की, 'पीडितेने संपूर्ण घटना डीएसपीला सांगितली आहे. या प्रकरणात पोलिस कॅफे मालकाचीही चौकशी करत आहेत.' उदयपूरचे एसपी योगेश गोयल यांनी सांगितले की, फ्रेंच महिलेने उदयपूरच्या बारागाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कॅफे मालकाची चौकशी केली आहे. आरोपी तरुणाचा शोध सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्येक पैलूची बारकाईने चौकशी केली जात आहे.

Crime: विदेशी पर्यटक महिलेवर बलात्कार, कॅफेतील पार्टीत भयंकर घडलं
Crime: सोनमपेक्षा भयंकर! आई आणि मुलीचा एकच बॉयफ्रेंड, लग्नानंतर ३० दिवसांत तरुणीने नवऱ्याला संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com