Delhi Crime News Saam tv
क्राईम

Delhi Crime: भररस्त्यात रक्तरंजित थरार, आधी गर्लफ्रेंडचा गळा चिरला, नंतर स्वत:वरही वार

Delhi Man Attacks Girlfriend with Knife: दिल्लीमध्ये भयंकर घटना घडली. तरुणाने भररस्त्यात गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला केला आणि स्वत:वर देखील वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

दिल्लीमध्ये भररस्त्यात रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडवर चाकू हल्ला केला. रस्त्यावरून जात असताना पाठीमागून येऊन या तरुणाने आधी गर्लफ्रेंडचा गळा चिरला. त्यानंतर त्याने स्वत: वरही चाकूने वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना घडली त्या दिल्लीतील रस्त्यावर अक्षरश: रक्ताचे पाट वाहत होते. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती देत दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दोघांची देखील प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दिल्ली कॅन्टमधील किवारी पॅलेस मेन रोडवर एका तरुणाने भाजी कापण्याच्या चाकूने गर्लफ्रेंडवर हल्ला केला. यानंतर त्याने स्वतःवरही चाकूने वार केले आणि तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिस दोघांचेही जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत होते. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलिसांनी रक्ताने माखलेला चाकू आणि इतर पुरावे गोळा केले. पोलिस दोघांच्याही कुटुंबियांचे जबाब घेत आहेत.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा फूटपाथवर रक्ताचे पाट वाहत होते. तरुणीच्या मानेतून खूप रक्त वाहत होते. जास्त रक्तस्त्राव होऊ नये म्हणून एका व्यक्तीने तिच्या मानेला कापड बांधले होते. या तरुणीच्या जवळच एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तरुणीवर चाकूने वार केल्यानंतर त्याने स्वतःवरही चाकूने वार केला. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्याकडे सापडलेल्या मोबाइलच्या मदतीने त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये काही काळापासून वाद सुरू होता. हल्ला करण्यापूर्वी तरुण जोर जोरात ओरडत तरुणीच्या दिशेने आला आणि त्याने तिच्यावर हल्ला केला. तरुणीच्या गळ्यावर वार केल्यानंतर ती रस्त्यावर पडली आणि जोरजोरात रडू लागली. यानंतर तरुणाने स्वत:च्या छातीवर आणि शरीरावर इतर ठिकाणी वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघेही गंभीर जखमी झाले. प्रेमातील विश्वासघात आणि मत्सराच्या भावनेतून तरुणाने हे भयंकर कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: स्वप्नपूर्ती! जिद्द, मेहनत अन् सातत्याच्या जोरावर क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; प्रदीप गोरड यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगडाटासह रायगडमध्ये रिमझिम पाऊस

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

SCROLL FOR NEXT