Crime : आईच्या प्रियकराची वाईट नजर, घरात कुणीच नसताना मुलीच्या शरीराचे लचके तोडले
Crime : आईच्या प्रियकराची वाईट नजर, घरात कुणीच नसताना मुलीच्या शरीराचे लचके तोडलेSaam Tv

Crime : आईच्या प्रियकराची वाईट नजर, घरात कुणीच नसताना मुलीच्या शरीराचे लचके तोडले

jalna Crime News : जालन्यात सहा वर्षाच्या चिमकुलीवर आईच्या प्रियकराकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कदीम जालना पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. जालन्यातील धक्कादायक घटनेनं एकच खळबळ
Published on

अक्षय शिंदे पाटील

Jalna Crime News in marathi : जालन्यात सहा वर्षाच्या चिमकुलीवर आईच्या प्रियकराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. कदीम जालना पोलिसांनी त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रशांत प्रकाश वाडेकर असं या आरोपीचं नाव आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक 28 वर्षीय महिला पतीपासून विभक्त झालेली असून, ती जुना जालना भागात खोली किरायाने घेऊन राहत आहे. तिला पहिल्या पतीपासून तीन मुली व एक मुलगा झालेला असून, त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी पतिकडे जिंतूर येथे राहतात. तर एक 6 व दुसरी 4 वर्षाची मुलगी त्या महिलेकडे राहत आहे.

महिला साफसफाई आणि घरगुती काम करून तिचा व मुलींचा उदरनिर्वाह भागवते. अशाच दोन वर्षांपूर्वी तिची एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत प्रकाश वाडेकर याच्याशी ओळख झाली होती. तेव्हापासून ती महिला आणि वाडेकर हे दोघे दोन वर्षांपासून किरायाच्या खोलीमध्ये एकत्रच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सदर महिला दुपारी 3.30 वाजेपर्यंत कामानिमित्त घराबाहेर असते, तर वाडेकर हा दिवसभर घरी राहून रात्री 7.30 वाजेनंतर हॉटेलमध्ये ड्युटीवर जातो. प्रशांत प्रकाश वाडेकर याने त्याची प्रेयसी असलेली महिला घरी नसतांना 6 वर्षीय मुलीवर आधी अनैसर्गिक कृत्ये केले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या चिमुकलीला खूप ताप आला होता, मोठ्या प्रमाणात उलट्याही होत होत्या.

Crime : आईच्या प्रियकराची वाईट नजर, घरात कुणीच नसताना मुलीच्या शरीराचे लचके तोडले
Crime : फिरायला गेले, मैत्रिणीने लग्नास नकार दिला, संतापलेल्या तरूणाने चाकूने सपासप वार केले

वाडेकर ड्युटीवर गेल्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यापूर्वीही वाडेकर याने त्या चिमुकल्या बालिकेसोबत असे घाणेरडे प्रकार केल्याचे तिने आईला सांगितले. यानंतर सदर महिलेने तातडीनं कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यावेळी कदिम जालना पोलिसांनी तातडीने आरोपी प्रशांत प्रकाश वाडेकर यास ताब्यात घेऊन सदर गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, जालना शहरात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

Crime : आईच्या प्रियकराची वाईट नजर, घरात कुणीच नसताना मुलीच्या शरीराचे लचके तोडले
Nanded Crime : आधी नवऱ्यानं आयुष्य संपवलं, त्याचठिकाणी बायकोचा मृतदेह आढळला; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

दोन वर्षापासून राहत होते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक 28 वर्षीय महिला पती पासून विभक्त झालेली असून ती महिला आणि आरोपी वाडेकर हे दोघे दोन वर्षापासून किरायाच्या खोलीमध्ये एकत्रच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते प्रकाश वाडेकर याने त्याची प्रयसी असलेली महिला घरी नसताना तिच्या सहा वर्षीय मुलीवर आधी अनैसर्गिक कृत्य केलं आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे..

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जालन्यात प्रेयसीच्या सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा संशयित आरोपी प्रकाश वाडेकर याला जालन्यातील कदिम जालना पोलिसांनी ताब्यात घेतल असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा गुन्हा आता पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग देखील करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com