Delhi Crime News Gaurav singhal Death Case Father Attacked On Son Before Wedding Know Shocking Reason Saamtv
क्राईम

Delhi Crime: जन्मदात्या बापाचं क्रुर कृत्य! लग्नाच्या काही तास आधी पोटच्या मुलाला संपवलं; धक्कादायक कारण समोर

Delhi Gym Trainer Death: लग्नाच्या काही तास आधी जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीमधून समोर आली आहे. चाकूने तब्बल १५ वार करत बापाने घटनास्थळावरुन पळ काढला

Gangappa Pujari

Delhi Crime News:

लग्नाच्या काही तास आधी जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीमधून समोर आली आहे. चाकूने तब्बल १५ वार करत बापाने घटनास्थळावरुन पळ काढला. या भयंकर घटनेने राजधानी दिल्लीमध्ये खळबळ उडाली असून या घटनेचं कारण आता समोर आले आहे. (Crime News In Marathi)

बुधवारी रात्री (ता. ६ मार्च) दक्षिण दिल्लीतील देवळी एक्स्टेंशनमध्ये 29 वर्षीय गौरव सिंघल या तरुणाची त्याच्या लग्नाच्या काही तास आधी चेहऱ्यावर आणि छातीवर 15 वेळा कात्रीने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलीस तपास करत त्याचे वडिल रंगलाल सिंघल याला राजस्थानमधील जयपूर येथून अटक करण्यात केली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने या हत्येचे धक्कादायक कारण उघड केले.

आरोपीने सांगितलेल्या माहितीनुसार, त्याचे त्याच्या पत्नीसोबत अनेक दिवसांपासून मतभेद होते. तो पत्नीपासून वेगळा राहत होता तर त्याचा मुलगा गौरव आणि त्याची आई सोबत रहात होते. गौरवने अनेक वेळा त्याचा अपमान केला होता. त्यामुळेच गेल्या चार महिन्यांपासून तो आपल्या मुलाचा खून करण्याचा कट रचत होता. तसेच लग्नाच्या एक दिवस आधी 2 मार्च रोजी मुलगा आणि वडील यांच्यात कडाक्याचे भांडण झाले, त्यात गौरवने वडिलांना थप्पड मारली. याचा राग रंगलालला आला होता. याच रागातून त्याने आपल्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने आपल्या मुलाची हत्या करण्यासाठी रात्री 10:30-11 वाजेची वेळ जाणूनबुजून निवडली होती. यावेळी घराजवळ ढोल-ताशांचा आवाज येत होता आणि गौरव त्याच्या होणाऱ्या पत्नीशी बोलण्यासाठी दुसऱ्या खोलीत बसला होता. हीच संधी साधून रंगीलालने गौरववर हल्ला करत त्याची हत्या केली. दरम्यान, गौरववर हल्ला केल्यानंतर आरोपीने थेट जयपूर गाठले. पोलिसांनी त्याच्याकडून दागिने, पैसे, कात्री आणि एक रॉड जप्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Rishab Shetty : ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार; 'कांतारा: चॅप्टर १'चं नवं पोस्टर रिलीज, पाहा PHOTOS

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

SCROLL FOR NEXT