Delhi Crime Saam Tv
क्राईम

Shocking News: अनैसर्गिक संबंधाच्या दबावाला कंटाळून मित्राची दगडाने ठेचून हत्या, दिल्लीतील थरकाप उडवणारी घटना

Delhi Crime News: अनैसर्गिक संबंधाच्या दबावाला कंटाळून रागाच्या भरात मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील खोया मंडी भागात डीडीए पार्कजवळ घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Friend Killed In Delhi

मित्र सतत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. त्यामुळं वैतागून तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केलीय. ही घटना दिल्लीतील खोया मंडी भागात डीडीए पार्कजवळ उघडकीस आली (Delhi Crime)आहे. २० वर्षीय तरुणावर अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी मित्राने दबाव टाकला. त्यामुळं त्याने संतापून मित्राची हत्या केली. (Crime News In Marathi)

हत्येनंतर आरोपी पळाला

हत्येनंतर आरोपीने मित्राचा चेहरा दगडाने ठेचला. मृताच्या खिशातील पैसे आणि फोन घेऊन पळ काढला. यानंतर तो ट्रेनमध्ये बसला आणि पंजाबमधील अमृतसरला गेला. चोरलेल्या पैशातून त्याने नवा मोबाइल खरेदी केला. पण त्यामुळेच तो अडकला. राजेश, असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर प्रमोदकुमार शुक्ला (friend killed) असं मृताचं नाव आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दगडाने ठेचून केली हत्या

मृत तरुण आणि आरोपी हे दोघे जिवलग मित्र होते. रागाच्या भरात २० वर्षीय तरूणाने दगडाने ठेचून मित्राची हत्या केलीय. त्यामुळे परिसरात खळबळ आहे. दोघेही बिहारच्या मधेपूरचे आहेत. उत्तर दिल्लीतील (Delhi) मोरी गेट येथील रेन बसेरा येथे ते राहतात. मोरी गेट येथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आला, असा काश्मिरी गेट पोलीस ठाण्यात फोन आला होता. तेव्हा ही घटना उघड झाली.

दिल्लीत (Delhi १९ जानेवारी रोजी ही घटना घडली. अनैसर्गिक लैंगिक संबंधाला कंटाळून (unnatural physical relation) हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलीस ठाण्यात फोन गेल्यानंतर लगेच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं. तेव्हा तरुणाच्या तोंडावर खूप जखमा होत्या. त्याचं तोंड संपुर्ण रक्तानं माखलेलं दिसलं. पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

आरोपीला अटक

उत्तर विभागाचे पोलीस उपायुक्त मनोज कुमार यांनी या प्रकरणात कारवाई सुरु केलीय. पोलीस घटनास्थळाच्या परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहे. प्रमोद कुमार शुक्ला, अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. प्रमोद आणि त्याचा मित्र राजेश यांच्यात मारामारी झाली (Friend Killed In Delhi) होती. पोलिसांनी दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत. तपासणी सुरु केली आहे. राहत्या घरातून राजेश फरार झाला होता. त्यामुळं पोलीस आरोपीचा शोध घेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला. प्रमोद राजेशवर अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा दबाब टाकत होता. त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये २४ वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

SCROLL FOR NEXT