Puneet Khurana Case Saam Tv
क्राईम

Crime News: रात्री ३ वाजता पत्नीशी फोनवरून भांडण, ५९ मिनिटांचा व्हिडीओ तयार करून आत्महत्या; दिल्लीच्या व्यावसायिकाने का उचललं टोकाचं पाऊल?

Puneet Khurana Case: दिल्लीतील कॅफे चालकने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली आहे.

Priya More

दिल्लीच्या मॉडल टाऊनमध्ये राहणाऱ्या कॅफे चालक पुनीत खुराणाने (४० वर्षीय) पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पुनीत खुराणा आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. अशामध्ये ३१ डिसेंबरला पुनीत आणि त्याच्या पत्नीमध्ये फोनवर कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर पुनीतने ५९ मिनिटांचा व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केली.

पुनीत आणि त्याच्या पत्नीचे शेवटचं बोलणं झाल्याचा १६ मिनिटांचा ऑडिओ देखील समोर आला आहे. दिल्लीमध्ये घडलेल्या या घटनेची तुलना बंगळुरूमधील इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणाशी केली जात आहे. अतुलने पत्नीच्या त्रासाला कंटाळून व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केली होती.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला मंगळावारी ४.१८ वाजता मॉडेल टाऊनमधील कल्याण विहार येथून एका आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा पुनीत खुराणा यांचा मृतदेह आढळून आला. पुनीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयाच्या ताब्यात देण्यात आला.

पुनीत खुराना आणि मनिका जगदीश यांचे 2016 मध्ये लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनीतची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्याचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पुनीतच्या आईने सांगितले की, वर्षभर सर्व काही सुरळीत गेले. मात्र त्यानंतर भांडणं सुरू झाली. पत्नीने त्याचा खूप छळ केला त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. काल दुपारी ३ वाजेपर्यंत त्याने दरवाजा न उघडल्याने आम्ही दरवाजा तोडला. त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

पुनीतच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनीत खुराना पत्नीसोबत बेकरीचा व्यवसाय करत होता. त्याने फॉर गॉड केक आणि वुडबॉक्स कॅफे नावाचे कॅफे सुरू केले होते. घटस्फोटाशिवाय व्यवसायाबाबतही दोघांमध्ये वाद झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सोमवार आणि मंगळवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास पुनीत आणि त्याच्या पत्नीमध्ये फोनवरून भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. १६ मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचे दिसून येत आहे.

फोनवर पुनीत खुराणाची पत्नी म्हणते की, 'आम्ही घटस्फोट घेत आहोत, पण मी अजूनही व्यवसायिक भागीदार आहे... तुम्हाला माझी थकबाकी भरावी लागेल' ती पुनीतला म्हणते, 'भिकारी, त्याने तुझ्याकडून काय मागितले ते सांग.' आता तुझी लायकी नाही. तुझा चेहरा बघायचा नाही. तू माझ्यासमोर आला तर मी तुझ्या थोबाडीत मारेल.' पुनीत खुराणाच्या आत्महत्येनंतर त्यांचा मोबाईल आणि इतर सामान जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी पुनीतच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले आहे.

पुनीतच्या बहिणीचे म्हणणे आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या भावाने 59 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. ज्यामध्ये त्याने आपला कसा छळ केला गेला हे सांगितले. तो म्हणाला, 'त्याला मरणासाठी उद्युक्त करण्यात आले. पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याचा एवढा छळ केल्याने त्याला असे पाऊल उचलावे लागले. पुनीतचा व्हिडिओ त्याच्या फोनमध्ये आहे. 59 मिनिटांचा हा व्हिडिओ पोलिसांना दाखवण्यात आला आहे.

आम्ही व्हिडिओ पाहिला आहे. यामध्ये त्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याचा मानसिक छळ कसा केला हे सांगितले आहे. त्याला धमकावून शिवीगाळ केली. घटस्फोटाच्या प्रकरणादरम्यान न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी कॅफेचे अधिकार दिले होते. इमेल आयडी मागून त्याने इन्स्टाग्राम आयडी हॅक केला होता. यामुळे माझ्या भावाला रात्री 3 वाजता तिला फोन करावा लागला होता.' दरम्यान पुनीत खुराणाच्या आत्महत्येमुळे त्याची आई आणि बहिणीला मोठा धक्का आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT