Fact Check : तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

Fact Check about whatsapp viral message : तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची...कारण, तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप आता बंद होणार आहे...तसा एक मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं...चला पाहुयात साम टीव्हीचा खास रिपोर्ट...
Whatsapp Will Not Working In These Smartphones
WhatsappSaam Tv
Published On

मुंबई : तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप आता बंद होणार...? नवीन वर्षात व्हॉट्सअॅप चालणार नाही...? व्हॉट्सअॅप बंद होणार असे मेसेज व्हायरल होतायत...हे बघा, 1 जानेवारीपासून व्हॉट्सअॅप बंद होणार आणि खाली मोबाईल कंपन्यांची लिस्टही जारी करण्यात आलीय...व्हॉट्सअप बंद झालं तर आता चॅटिंग कसं करायचं...? खरंच व्हॉट्सअॅप बंद होणार का...? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतीलच...

..हा दावा म्हणजे व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी धक्का देणारा आहे...मात्र, हा दावा खरा आहे का...? या दाव्यात कितपत तथ्य आहे...? याची पडताळणी करणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय हेदेखील पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की, लाखो अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअॅप काम करणे बंद करेल. मेटाच्या मालकीचे हे अॅप जुनी ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या अँड्रॉइड फोनसाठी सपोर्ट बंद होईल.

या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी खरी माहिती मेटा कंपनी देऊ शकते...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची सत्यता पडताळणीसाठी मेटा कंपनीशी संपर्क साधला...त्यावेळी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता, काय सत्य समोर आलं पाहुयात...

Whatsapp Will Not Working In These Smartphones
Biker Stunt Viral: सांगा बरं, चूक कोणाची! घाटातील वळणाच्या रस्त्यावर दुचाकीस्वाराचा 'शहाणपणा'|Video Viral

अँड्रॉइड KitKat व्हर्जनच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार

10 वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर व्हॉट्सॲप सपोर्ट बंद करणार

1 जानेवारी 2025 नंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही

मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल

सिस्टम अपडेट न केल्यास नवीन मोबाईल घ्यावा लागेल

सर्वच मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार नाही...मात्र, काही मोबाईल आहेत त्यावर 1 जानेवारीपासून व्हॉट्सअॅप बंद होईल...ते कोणते मोबाईल आहेत पाहुयात...

या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार?

सॅमसंग

सॅमसंग गॅलक्सी S4 मिनी, गॅलक्सी S3, गॅलक्सी नोट 2, गॅलक्सी अॅस 3

मोटोरोला

मोटो जी

मोटो RAZR एचडी

मोटो E2014

एलजी

एलजी ऑपटीमस जी, नेक्सस 4, जी2 मिनी, L90

सोनी

सोनी एक्स्पेरिया Z,एक्स्पेरिया SP,एक्स्पेरिया T,एक्स्पेरिया V

Whatsapp Will Not Working In These Smartphones
Viral Video: आधी मान धरली, मग खाली पाडला, दोघांनी लाथांनी तुडवला, पुण्यात भररस्त्यावर मारहाण, व्हिडीओ व्हायरल

त्यामुळे या कंपनीचा मोबाईल तुमच्याकडे असेल तर सिस्टम अपडेट करून घ्या...नाहीतर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी नवीन मोबाईल घ्यावा लागेल...व्हॉट्सॲपचे नवीन फिचर्स वापरण्यासाठी अॅप अपडेट करत राहणे महत्त्वाचे आहे...सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत किटकॅट वर्जन असलेल्या अॅड्रॉईड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप 1 जानेवारीपासून बंद होणार हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com