Delhi Crime Saam TV
क्राईम

Delhi Crime news: भयंकर! भांडणानंतर बायकोनं नवऱ्याच्या कानाला घेतला चावा; तुकडाच पाडला

Crime News: दिल्लीत सुलतानपुरी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने रागाच्या भरात पतीचा उजवा कान चावला. त्यात पतीला गंभीर दुखापत झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Sultanpuri Crime News:

दिल्लीत सुलतानपुरी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने रागाच्या भरात पतीचा उजवा कान चावल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे.

एका ४५ वर्षीय महिलेने रागाच्या भरात पतीचा उजवा कान चावला. यात कानाचा वरचा भाग कापला गेला. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर पतीने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या महिलेविरोधात आयपीसी कलम 324 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलीस सध्या या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. (Crime News)

पीडित व्यक्तीने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. '२० नोव्हेंबर रोजी कचरा टाकून घरी आल्यावर आमच्यात वाद झाला. त्यात तिने वेगळे राहण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर तिने घर आणि तिचा हिस्सा विकण्याची मागणी केली. त्याच रागातून तिने हे कृत्य केलं', असं त्याने सांगितले.

यानंतर त्यांच्यातील भांडण वाढले. त्यानंतर महिलेने पतीवर हल्ला केला. पीडित घरातून निघून जात असताना पत्नीने त्याला पकडले आणि त्याच्या उजव्या कानाचा चावा घेतला. यात कानाचा वरचा भाग कापला गेला. त्यानंतर पीडित व्यक्तीला मंगोलपुरी येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले.

पोलिसांना २० नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून या संपूर्ण घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तपास सुरु करण्यात आला. पीडित व्यक्तीची प्रकृती ठिक नसल्याने सुरुवातील तो काही सांगू शकला नाही. परंतु दोन दिवसांनी २२ नोव्हेंबर रोजी पोलिसांना कळवले आणि तक्रार दाखल केली. पोलीस या संपूर्ण प्रकाराचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT