दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक वादातून एका व्यक्तीला मिनीबसच्या बोनेटवर ३ किमीपर्यंत लवकवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी दक्षिण दिल्लीच्या कोटला मुबारकपूर भागात ही घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, एक व्यक्ती मिनीबसच्या बोनेटवर लटकलेली आहे. ती मोठ्याने ओरडताना दिसत आहे, गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मिनीबस ड्रायव्हर गाडी थांबवण्याच्या मन:स्थितीत नाही. विकी कुमार या व्यक्तीसोबत हा जीवघेणा प्रकार घडला आहे. तर या प्रकरणी आरोपी मनोज कुमारला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी कुमारने कँटर ट्रक आणि मिनीबस यांची धडक थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिनीबसच्या ड्रायव्हरने विकीला बोनेटवर बसवून फरफटत नेले. तब्बल ३ किमी अंतरापर्यंत बसचालकाने त्यांना बोनेटवर नेले.
रात्री ११.३० वाजता एका व्यक्तीचा (विकी) फोन आला. एका मिनीबसने आपल्या मिनी ट्रकला धडक दिल्याची तक्रार त्याने केली. मिनीबस चालकाने मला बोनेवर लटकवत ३ किमीपर्यंत नेल्याची आपबिती देखील फोन केलेल्या व्यक्तीने सांगितली. पीडित व्यक्ती बस थांबवण्याची विनंती करत होता, मात्र ड्रायव्हरने बस थांबवली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मिनीबस जप्त केली आहे.
पीडित विकीने घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं की, मी माझ्या ट्रकमधून प्रवास करत होतो. यावेळी एक मिनीबस डाव्या बाजूला आला आणि साईड मागू लागला. त्यामुळे माझा त्याच्याशी वाद झाला. त्याने माझ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु यात मिनीबस ट्रकवर आदळली. त्यामुळे मी माझ्या ट्रकमधून बाहेर आलो आणि मिनीबसच्या दिशेने धावत गेलो.
आरोपीने तातडीने मिनीबसचे दरवाजे बंद केले. त्यानंतर आरोपीने गाडी पळवली. मी समोर उभा असल्याने मिनीबसच्या बोनेटवर उभा राहिलो नाहीतर बसच्या टायरखाली चिरडलो गेलो असते. मात्र बस ड्रायव्हरने मला बोनेटवर तब्बल ३ किलोमीटरपर्यंत दूर नेले. रस्त्यावरील काही वाहन चालकांनी मिनीबस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो थांबवा नाही. अखेर थोडी स्लो झाली तेव्हा मी उडी मारली अशी माहिती विकीने पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मनोजला अटक केली असून अधिक तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.