Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO
राज्यातील सर्वाधिक हाय होल्टेज लढत असलेल्या बारामतीतून अजित पवारांनी पुतण्या युगेंद्र पवारांचा 1 लाख मतांनी पराभव केला. त्याबाबत बोलताना शरद पवारांनी अजित पवारांचं कौतूक करत युगेंद्र पवारांना लढवण्यामागचं कारण सांगितलंय...
मात्र यावर अजितदादांनी आक्षेप घेतला. कारण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. मात्र कुटुंबात एकमेकांच्या विरोधात उमेदवारी देणं ही चूक झाली, अशी कबुली अजित पवारांनी दिली होती. त्यानंतरही पवारांनी पुतण्याला मैदानात उतरवल्याबद्दल अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यातच आता युगेंद्र पवार पराभूत झाल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय...
विधानसभा निवडणुकीत काका-पुतण्यातील कलगितुरा महाराष्ट्राने पाहिला. मात्र निकालानंतर अजितदादांनी महाराष्ट्रातील कुटुंब फोडण्याला पवारांना जबाबदार धरलंय.. त्यामुळे निकालानंतर पवार कुटुंबातील कटुता कमी होण्याची चर्चा असतानाच अजित पवारांनी थेट पवारांवर निशाणा साधल्याने पवार कुटुंबातील भांडण चव्हाट्यावर आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.