लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तीन पर्यटकांवर लाेणावळा पाेलिसांनी कारवाई केली आहे. याबराेबरच बेकायदेशिर हुक्का विक्री प्रकरणी तसेच रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरु ठेवणा-यांवर लाेणावळा पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. (Maharashtra News)
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक (satya sai karthik) यांनी लाेणावळ्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ठाेस पावले उचलली आहेत. लाेणावळा पालिकेस देखील काही उपाययाेजना सूचविल्या आहेत.
दरम्यान लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे हुक्का विक्री करण्यास किंवा ताे पिण्यास बंदी असतानाही खुलेआम हुक्का विक्री करीत असलेल्या दोघांवर कारवाई करत लोणावळा पोलिसांनी गुन्हा दखल केला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संतोष शंकर आखाडे व दिपक भागु हिरवे असे गुन्हा नाेंदविलेल्यांचे नाव आहे.
याबराेबरच रात्री उशिरापर्यंत शहरात दुकाने खुली ठेवणाऱ्या सहा जणांवर पाेलिसांनी खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तीन पर्यटकांवर देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संशयितांकडून सात हुक्का पॉट, प्लास्टिक फिल्टर व फ्लेवर मिंट असा 14 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.