Delhi Rape Case News Saam Tv News
क्राईम

Crime News : ९ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळली; देश हादरला

Delhi Rape Case News : ही घटना घडली ती दिल्लीतील नेहरू विहार भागात. शनिवारी रात्री नऊ वर्षाची मुलगी एका फ्लॅटमधील सुटकेसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला.

Prashant Patil

नवी दिल्ली : भारतात बलात्काराच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशीच संतापजनक घटना दिल्लीत घडली आहे. नऊ वर्षाच्या मुलीवर नराधमाने बलात्कार केला आहे. ती बर्फ घेऊन आपल्या आजीच्या घराकडे गेली होती. पण, बराच वेळ उलटला तरी लेक घरी आलीच नाही. मग शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी कळलं की ती घरातून निघाली, पण आजीच्या घरी पोहोचलीच नाही. मग कळलं की, काही लहान मुलांनी तिला एका फ्लॅटमध्ये जाताना बघितलं. त्यानंतर जे समोर आलं, ते धक्कादायक होतं. मुलगी एका सुटकेसमध्ये अर्धनग्न अवस्थेत आणि बेशुद्ध पडलेली होती.

ही घटना घडली ती दिल्लीतील नेहरू विहार भागात. शनिवारी रात्री नऊ वर्षाची मुलगी एका फ्लॅटमधील सुटकेसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला.

पोलिसांनी सांगितलं की, मुलीचे वडील तिला रुग्णालयात घेऊन चालले होते. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिने प्राण सोडला. रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या आईवडिलांनी कॉलनीमध्ये राहणाऱ्या नौशाद नावाच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. संशयित आरोपी घटना घडल्यापासून फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी तिच्या आजीच्या घरी बर्फ द्यायला गेली होती. पण ती तिकडे पोहोचलीच नाही. शोध घेत असताना काही लहान मुलांनी ती कॉलनीमधीलच एका फ्लॅटमध्ये जाताना दिसल्याचं सांगितलं. जेव्हा मुलीचे आईवडील आणि नातेवाईक त्या फ्लॅटकडे गेले, तेव्हा दरवाजाला कुलूप लावलेलं होतं. त्यामुळे त्यांनी कुलूप तोडलं आणि घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना एक सुटकेस दिसली. त्यातून रक्त ठिपकत होते. त्यांनी ती सुटकेस उघडली, त्यात नऊ वर्षाची मुलगी बेशुद्धावस्थेत पडलेली होती. ते लगेच तिला रुग्णालयात घेऊन निघाले, पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला असून, दिल्ली आणि दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांवर धाडीही टाकल्या. पोलिसांनी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT