घरी कुणी नसताना शेततळ्यावर गेले, मासे पकडण्यासाठी जाळी फेकली, पाय अडकला अन्...; दोन्ही भावांचा अंत

Chhatrapati Sambhajinagar Two Brothers Drown : एक हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावंडाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Two Brothers Drown
Chhatrapati Sambhajinagar Two Brothers DrownSaam Tv News
Published On

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात अनेक तरुण तरुणी कोणत्या न कोणत्या नदीवर किंवा धबधब्यांवर पोहायला जातात, तसेच पर्यटनाला देखील जात असतात. अतिउत्साहात अनेक जणांचा जीव देखील जातो. अशीच एक हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावंडाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.

पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथील सतीश आगळे (वय १८) आणि गौरव आगळे (वय १६) हे दोन भाऊ कुटुंबातील व्यक्ती लग्नासाठी बाहेरगावी गेले असता ते शेततळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेले. तिथे पोहोचल्यावर मासे पकडण्यासाठीची जाळी तळ्यात फेकली. मात्र, या जाळीमध्ये त्यांचा पाय गुंतून पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या तरुणांचा पाण्यामध्ये शोध घेण्यात येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Two Brothers Drown
Shocking Crime : वॉर्ड बॉयने मला घाण इशारा केला, झोपेत वाईट स्पर्श; महिला रुग्णाने सांगितला 'त्या' रात्रीचा घटनाक्रम

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला

जळगाव जिल्ह्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या मेहरुण तलावात पाच ते सहा तरुण मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण बुडाल्याने बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र सायंकाळी अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

जळगाव शहरातील तांबापुरा रामनगर भागातील नदीम शेख गनी (वय २४) असे तलावात बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. रामनगर परिसरातील ५ ते ६ तरुणांनी ईदनिमित्त सुट्टी असल्याने दुपारच्या वेळी मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यात नदीम शेख गनी (वय २४) यांच्याकडे ईदसाठी आलेला पाहुणा अजहर खान नबी खान (वय २५), नदिमचा मामे भाऊ इरफान शेख, अजहरचा मामे भाऊ तोहिद खान रईस खान आणि मोसीन शेख दुपारी मेहरुण तलावावर गेले.

नदीम बुडाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच परिसरातील नागरिक, तरूणांनी तलावावर गर्दी केली. यानंतर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचले. यानंतर पोलिसांनी मेहरुण- तांबापुरा, रामेश्वर कॉलनीतील पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावले. सायंकाळपर्यंत शोध घेतला असता तरुणाचा शोध लागला नाही. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. तर आज सकाळी पुन्हा शोध कार्य सुरु करण्यात आले होते.

Chhatrapati Sambhajinagar Two Brothers Drown
Indore Couple Missing : तोच पांढरा शर्ट, रक्तानं माखलेला रेनकोट, उलट्या फोटोचं गुपित; हनिमून हत्याकांडातील सोनम-राजाचं रहस्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com