ऐकावं ते नवलच! ईदच्या दिवशी बकरी नाही, स्वत:च्याच मानेवर फिरवला सूरा; कारण ऐकाल तर थक्क व्हाल...

Crime News : घटनास्थळावरून पोलिसांना सापडलेल्या सुसाईडनोटमध्ये इस्मुहलम्मद अन्सारीनं लिहिलं आहे की, 'माणूस आपल्या लेकरासारखंच बकऱ्याचे पालनपोषण करतो. त्यानंतर ईदच्या दिवशीच आपण त्यांची हत्या करतो.
suicide on Bakri Eid
suicide on Bakri EidSaam Tv News
Published On

देवरिया : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात बकरी ईद दिवशी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ईसमुहम्मद अन्सारी नावाच्या एका तरुणानं धारदार शस्त्रानं स्वत:चं मुंडकं छाटलं आहे. या घटनेमुळे घटनास्थळ आणि भोवतालचा परिसर हादरून गेला आहे. घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे.

घटनास्थळावरून पोलिसांना सापडलेल्या सुसाईडनोटमध्ये इस्मुहलम्मद अन्सारीनं लिहिलं आहे की, 'माणूस आपल्या लेकरासारखंच बकऱ्याचे पालनपोषण करतो. त्यानंतर ईदच्या दिवशीच आपण त्यांची हत्या करतो. माणूस एक जिवंत प्राणी आहे, त्याचप्रमाणे एखादं जनावर सजीवच असतं, मी अल्लाहच्या दूताच्या नावानं माझा जीव देत आहे. मला कोणीही मारलेलं नाही. माझ्या मृत्यूनंतर आपण माझी कबर एका खुंटीजवळ बनवावी,' असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

suicide on Bakri Eid
Indore Couple Missing : तोच पांढरा शर्ट, रक्तानं माखलेला रेनकोट, उलट्या फोटोचं गुपित; हनिमून हत्याकांडातील सोनम-राजाचं रहस्य

मृत तरुणाची पत्नी हजरा खातूनने या कृत्यामागील कारण सांगितलं आहे. ती म्हणाली की, 'माझ्या पतीला भूताने झपाटलेलं होतं, आणि तो अनेकदा आझमगडच्या दर्ग्यात जायचा'. पुढे हजरा खातूनने सांगितलं की, 'तो तीन दिवसांआधीच दर्ग्यावरुन परतला होता. शनिवारी इस्मुहम्मद अन्सारी एका ठिकाणी बसून मंत्र बोलत होता. त्यानंतर त्याने लोखंडी धारदार शस्त्राच्या सहाय्याने स्वत:च्या मानेवर सूरा फिरवला'. घटनेनंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या भयानक घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत त्याला रुग्णालयात नेलं आणि नंतर गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुन्हा तपास करण्यास सुरूवात केली असता, घटनेची पुष्टी करण्यात आली. घटनास्थळावरुन गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांवरुन आणि जप्त केलेल्या सुसाईड नोटवरुन आत्महत्येचं प्रकरण समोर आलं आहे. घटनेमागील संपूर्ण सत्य उघड करण्यासाठी पोलीस इतर सर्व घटनेचा खोलवर तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

suicide on Bakri Eid
Shocking Crime : वॉर्ड बॉयने मला घाण इशारा केला, झोपेत वाईट स्पर्श; महिला रुग्णाने सांगितला 'त्या' रात्रीचा घटनाक्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com