dahanu police arrest youth from west bengal  saam tv
क्राईम

Palghar Crime News: प्रेयसीची हत्या करणाऱ्या युवकास पश्चिम बंगालमधून अटक, डहाणू पोलिसांची कारवाई

Palghar Latest Marathi News : हे प्रेमी युगुल विवाहित आहे. आपल्या पती-पत्नीला सोडून ते डहाणू येथे खोट्या नावाने मागील काही महिन्यांपासून राहत होते.

रुपेश पाटील

Palghar :

किरकोळ वादावरून आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या करून पसार झालेल्या प्रियकराला पश्चिम बंगाल मधून अटक करण्यात डहाणू पोलिसांना यश आले आहे. रवींद्र रेड्डी असे आराेपीचे नाव असून त्याला न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डहाणूच्या पोलिस उपअधीक्षक अंकिता कणसे करत आहेत. (Maharashtra News)

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील लोणीपाडा येथे गेल्या आठवड्यात एका महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर तिच्यासोबत पश्चिम बंगाल मधून पळून आलेल्या तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले.

हे प्रेमी युगुल विवाहित असून आपल्या पती-पत्नीला सोडून ते डहाणू येथे खोट्या नावाने मागील काही महिन्यांपासून राहत होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाल्याने प्रियकर रवींद्र याने प्रियशी अनिशा रेड्डी हिची हत्या केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या हत्येनंतर पश्चिम बंगाल येथे पळून गेलेल्या प्रियकराला डहाणू पोलिसांनी मोठ्या शिताफीने सात दिवसांच्या पथक प्रयत्नानंतर अटक केली. पाेलिसांनी आराेप रवींद्र रेड्डी याच्यावर डहाणू पोलिस ठाण्यात (कलम 302) गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याला न्यायालयात हजर केलं असता 1 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . या प्रकरणाचा अधिक तपास सद्या डहाणूच्या पोलीस उप अधीक्षक अंकिता कणसे करत आहेत .

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् १ लाखांची पेन्शन मिळवा

Phaltan Doctor Death : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, आरोपी बनकरच्या बहिणीचा धक्कादायक दावा | VIDEO

Hingoli Crime : साताऱ्यानंतर हिंगोली हादरली, महिलेवर बलात्कार; पोलिसांची चूक वाचून संतप्त व्हाल

Maharashtra Live News Update: अखेर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

Sanjay Shirsat: ४ वेळा आमदार राहिलो आता बस झालंं; महायुतीच्या मंत्र्याकडून निवृत्तीचे संकेत|VIDEO

SCROLL FOR NEXT