saam tv
क्राईम

Crime News : मुंबई विमानतळावर 3 किलो सोने, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर 40 किलो अफू जप्त; तिघांना अटक (video)

या कारवाईत मनीष मोहनराम या परप्रांतीय तरुणासह मोहन चव्हाण आणि अमीर जमादार या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Crime News :

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (बुधवार) कस्टम डिपार्टमेंटने सुमारे ३ किलो सोन जप्त केले. सुमारे १.७६ लाख रुपये साेन्याची बाजारभाव किंमत असल्याची माहिती अधिका-यांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर 40 किलो अफू व एक किलो गांजासह तिघांना अटक करण्यात पाेलिसांना यश आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज कस्टम अधिका-यांनी प्रवाशांची तपासणी केली असता काही प्रवाशांनी विशेषत: महिलांनी त्यांच्या चपला, कपड्यांमधून साेने आणल्याचे निदर्शनास आले. याबराेबरच प्रवाशांनी हॅण्ड ब्लेंडर तसेच खेळण्यातूनही सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. काहींनी सोने त्यांच्या शरीरात लपवल्याचे तपासात उघड झाले.

अधिका-यांनी एकूण ३ किलो सोन जप्त केले आहे. वेगवेगळ्या एकूण ८ प्रकरणांमध्ये कस्टम अधिका-यांनी चार आयफोनसह १.१८ लाखांचे अमेरिकन डॉलर देखील जप्त केले आहेत.

काेल्हापूर एलसीबीची माेठी कारवाई

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गायकवाड पेट्रोल पंपाजवळ आज (बुधवार) कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली. कोल्हापूर पोलिसांनी छापेमारी करीत 5 लाख 21 हजार 400 रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. यामध्ये 40 किलो अफू व एक किलो गांजा याचा समावेश आहे. (Maharashtra News)

या कारवाईत मनीष मोहनराम या परप्रांतीय तरुणासह मोहन चव्हाण आणि अमीर जमादार या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT