Dodamarg News: दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

Konkan News in Marathi: 'गणराज कृपाकर पण शेताचे नुकसान करू नको, जंगलातच राहा' अशी विनवणी ग्रामस्थ करु लागले आहेत. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल हाेऊ लागला आहे.
Farmers From Dodamarg Worried Of Elephants Who Enter In There Farms
Farmers From Dodamarg Worried Of Elephants Who Enter In There Farmssaam tv
Published On

- विनायक वंजारे

Konkan News:

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात सध्या हत्ती आणि हत्तीच्या एका पिल्लूने धुमाकूळ घातला आहे. हे दोन्ही हत्ती मोर्ले परीसरातील शेती, फळ बागांमध्ये घुसत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या हत्तींकडून बागायतीसह शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊ लागले आहे. भरवस्ती जवळ येऊन हे हत्ती बागायतींचे नुकसान करत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागली आहे. हत्तींमुळे परिसर चिंताग्रस्त झाला आहे.

Farmers From Dodamarg Worried Of Elephants Who Enter In There Farms
Sindhudurg Chipi Airport : चिपी हैदराबाद विमान फेरी रद्द, टेक ऑफ घेण्याच्या तयारीत असताना नेमकं काय घडलं?

दरम्यान घरा शेजारी येऊन नुकसान करणाऱ्या हत्तींशी विनवणी करतानाचा एका ग्रामस्थाचा व्हिडिओ सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हायरल हाेऊ लागला आहे. 'गणराज कृपाकर पण शेताचे नुकसान करू नको, जंगलातच राहा' अशी विनंती ग्रामस्थ हत्तीला करताना दिसत आहे. त्यानंतर हत्ती देखील माघारी फिरताना या व्हिडिओत दिसून येत आहे. (Maharashtra News)

दरम्यान सिंधुदूर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये हत्ती घराशेजारील ठेवले पाणी देखील फस्त करत असल्याने ग्रामस्थ चिंतेत पडले आहेत. काहींनी तर समाज माध्यमात व्हिडिओ पाेस्ट करुन भय इथले संपत नाही असे नमूद करुन हत्तींचा बंदाेबस्त करण्याची मागणी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Farmers From Dodamarg Worried Of Elephants Who Enter In There Farms
Kolhapur News : कोल्हापूरकरांनो! पाणी जरा जपून वापरा, राधानगरीसह काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात हाेतेय घट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com