Young Man Killed Himself  saam tv
क्राईम

Crime News: हॅलो बाबू! मी मरतो..., गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल करत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Young Man Killed Himself : एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडलीय. एका तरुणाने आपल्या प्रेयसीला फोन करत आत्महत्या केलीय. प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला आणि त्यानंतर काहीवेळात त्याने गळ्याला फास लावला आणि आपलं जीवन संपवलं.

Bharat Jadhav

हे प्रकरण बिहारमधील भागलपूर मधील लालमाटिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नसरतखानी परिसरातील आहे. संदीप कुमार (२४, रा. नसरतखानी, रा. चुन्नी देव प्रसाद सिंग यांचा मुलगा) असे आत्महत्या करणाऱ्या मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा संदीप कुमार खूप अस्वस्थ होता आणि आत्महत्येच्या वेळी तो घरात एकटाच होता. त्यावेळी त्याने हे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलंय.

मिळालेल्या माहितीनुसार,संदीप कुमार नावाच्या तरुणाने आत्महत्या जेव्हा केली त्याआधी त्याने आपल्या प्रेयसीला फोन कॉल केला होता. त्यावेळी प्रेयसीने त्याला घरी येण्याबाबत सांगितले, मात्र तरुणाने तिला नकार दिला. काहीवेळाने जेव्हा प्रेयसी तरुणाच्या घरी गेली तेव्हा त्याला पाहून तिच्या पायाखालची वाळू सरकली. संदीपच्या घरी आल्यानंतर तिने जे दृश्य पाहिलं ते पाहून तिच्या हृदयाचा ठोका चुकला.

ज्यासोबत काही वेळापूर्वी फोनवर गप्पा केल्या त्याने गळ्याला फास लावत जीवन संपवलं होतं, हे पाहून प्रेयसीला मोठा धक्का बसला. त्यानंतर संदीपच्या प्रेयसीने हा सर्व प्रकराची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृताच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी संदीपच्या घरी कोणीही नव्हते. आई आणि भाऊ कुंभस्नानासाठी प्रयागला गेले होते.

पोलिसांनी संदीपच्या वडिलांना कॉल केला. पोलिसांनी माहिती दिल्यानंतर संदीपचे वडील घरी पोहोचले, तेव्हा त्यांनी संदीपच्या प्रेयसीवर मुलाच्या हत्येचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली जात आहे. संदीपच्या वडील चुन्नी देव सिंह यांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांचा मुलगा संदीपची हत्या त्याच्या प्रेयसीने केलीय. तिने तिच्यासोबत अजून एका मुलाला आणले होतं.

आपण संदीपच्या प्रेयसीला ओळखत नसल्याचं सांगितलं. शहराचे डीएसपी राकेश कुमार म्हणाले की,पोलीस आणि एफएसएल टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांचीही चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT