Pune Crime : वर्गमित्राचा जाच, पुण्यात तरुणीनं आयुष्य संपवलं, मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला, अन्...

Pune Tathawade Young Student Commits Suicide : ज्यावेळी सहिती हिने आत्महत्या केली होती. त्यावेळी तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
Akurdi 20 years old Young Student sahiti reddy  Suicide
Akurdi 20 years old Young Student sahiti reddy SuicideSaamTV
Published On

पुणे : वर्गमित्राच्या जाचाला कंटाळून पिंपरी चिंचवडमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली. इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून तिने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. वर्गमित्राकडून वारंवार होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून तिने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात आले आहे.

सहिती कलुगोटाला रेड्डी (वय २०) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. सहिती ही आकुर्डीतील डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. या प्रकरणी पोलिसांनी प्रणव राजेंद्र डोंगरे यास अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुण्यातील ताथवडे येथे हा प्रकार घडला आहे.

Akurdi 20 years old Young Student sahiti reddy  Suicide
बस ड्रायव्हरकडून मिठाईच्या खोक्यात ड्रग्ज विक्री, कराडमध्ये अंमली पदार्थांचं रॅकेट पकडलं; मुंबई कनेक्शन समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सहिती हिने आत्महत्या केली होती. त्यावेळी तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र पोलिसांना पुरावा म्हणून सहिती हिने तिच्या मोबाईलमध्ये अनेक रेकॉर्डिंग आणि मेसेज ठेवले होते. याशिवाय तिने हे तिच्या काही जवळच्या मित्रांना देखील शेअर केले होते. त्यात तिने स्वतःचा मोबाईल कुठे ठेवला आहे आणि याचा पासवर्ड देखील सांगितला होता.

हे तिच्या मित्र मैत्रिणीकडून तिच्या वडिलांना समजले. त्यानंतर तिच्या वडिलांनी ही बाब पोलिसांच्या कानावर घातली. त्यानंतर सर्व सूत्र हलली. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असून तिच्या आत्महत्येमागील खरे सत्य समोर आलं आहे. सर्व गोष्टींची पडताळणी आणि पुरव्याची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी प्रणव डोंगरे यांस ताब्यात घेतले असून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akurdi 20 years old Young Student sahiti reddy  Suicide
Dombivli : डोंबिवलीतील बेघर होणाऱ्या ६५०० कुटुंबांना दिलासा, रहिवाशांसाठी कोणता पर्याय झाला खुला? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com