Minal Dalvi Saam Tv
क्राईम

Shocking News: निलंबित महिला तहसीलदाराकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले

Suspended Alibagh Tehsildar Minal Dalvi: अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी लाचखोरी प्रकरणात निलंबित आहेत. त्यांच्याकडे सव्वादोन कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Rohini Gudaghe

Minal Dalvi found Unaccounted Assets

महसूल विभागात भ्रष्ट्राचाराच्या घटना नेहमी समोर येत असतात. दोन वर्षांपूर्वी लाचखोरी प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी (Minal Dalvi) यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता त्यांच्याकडे सव्वादोन कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. (Latest Crime News)

निलंबित अलिबाग तहसीलदार मीनल दळवी आणि आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्याकडे सव्वादोन कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी लाचखोरी प्रकरणात निलंबित (Suspended Alibagh Tehsildar Minal Dalvi) आहेत. बेहिशेबी मालमत्ता सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा

ही मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पनापेक्षा 84 टक्के अधिक आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबागमध्ये दोन वर्षांपूर्वी मिनल दळवी या तहसिलदार म्हणून कार्यरत (Alibagh Tehsildar) होत्या. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिनल दळवी यांना 2 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.

मिनल दळवी आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 84 टक्के अधिक म्हणजे सव्वादोन कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता सापडली (Crime News) आहे. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी नवी मुंबई पथकाने मीनल दळवी यांना सापळा रचून लाच घेताना अटक केली होती. तेव्हा महिन्याभर लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी यांच्या मागावर होते.

सापळा रचून अटक केली

११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने तक्रारदाराकडून २ लाख रूपये लाच घेताना राकेश चव्हाण याला अटक केली होती. तेव्हा राकेश चव्हाण याने दळवींसाठी लाच घेत असल्याचं सांगितलं (Unaccounted Assets) होतं.

तहसीलदार दळवी यांच्या मागावर होते. अलिबाग येथील त्यांच्या घराची तपासणी केली असता ६० तोळे सोने आणि २८ हजार रोकड मिळाली होती. तर मुंबई विक्रोळी याठिकाणीही दळवी यांची मालमत्ता असल्याचं समोर आलं होतं तेथील घरातून एक कोटी रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT