Honor killing crime case Saam Tv
क्राईम

Crime News : लग्नानंतर त्याच दिवशी मुलगी माहेरी आली, बेडरुममध्ये झोपली, सकाळी मृतदेहच सापडला, त्या रात्री काय घडलं?

Shocking News : कुटुंबाच्या विरोधात जाऊन एका तरुणीने प्रियकराशी लग्न केले. कोर्टात लग्न करुन ती घरी परतली. तरुणीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Yash Shirke

Crime : घरच्यांच्या विरोधात जाऊन एका २३ वर्षीय तरुणीने प्रियकराशी लग्न केले. रागाच्या भरात तरुणीच्या वडिलांनी आणि भावाने गळा दाबून तिची हत्या केली. ही गोष्ट लपवण्यासाठी त्यांनी तरुणीचे अंतिम संस्कार केले. तरुणीच्या प्रियकराने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या चिपियाना गावात ही घटना घडली आहे. मृत तरुणीचे नाव नेहा आहे. नेहाचे तिच्या शेजारी राहणाऱ्या सूरज या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे शेजारी राहत असून एकाच शाळेत शिकले होते. शाळेपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. पण नेहाच्या कुटुंबीयांना त्यांच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे नेहा आणि सूरज यांनी पळून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मंगळवार, ११ मार्च रोजी नेहा कपडे खरेदी करण्याचे कारण देत घराबाहेर पडली. गाझियाबाद कोर्टात जाऊन तिने सूरजशी लग्न केले.नेहाच्या भावाच्या एका मित्राने नेहा आणि सूरज यांना कोर्टात पाहिले. त्या मित्राने नेहाच्या भावाला याबद्दल कळवले. हे कळताच कुटुंबीयांनी नेहाला घरी बोलावले. घरी गेल्यावर नेहाचा तिचा भाऊ आणि वडील यांच्याशी वाद झाला. त्यानंतर दोघांनी रात्री झोपेत नेहाला मारण्याचा कट रचला. दोघांनी मिळून नेहाचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्येबाबत कोणाला शंका येऊ नये म्हणून त्यांनी लगेच नेहाचे अंतिम संस्कार देखील केले.

नेहाशी संपर्क न झाल्याने सूरजने पोलीस ठाण्यात धाव घेतली. बिसरख पोलीस ठाण्यातील एक पथक चिपियाना गावात पाठवण्यात आले. नेहाचा आजाराने मृत्यी झाला आणि त्यानंतर लगेच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. याबाबत संशय आल्याने पोलिसांनी नेहाच्या वडील आणि भावाची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी मिळून नेहाचा गळा दाबून तिची हत्या केल्याचे कबूल केले. या प्रकरणात पोलिसांनी भानू आणि हिमांशू राठोड या पितापुत्राला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT