Rajasthan Crime News Saam Digital
क्राईम

Crime News: जन्मदात्या बापाचे क्रूर कृत्य, पोटच्या मुलीला हत्येनंतर जाळलं; धक्कादायक कारण समोर

Rajasthan Crime News: राजस्थानमधून एक मन्न सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह पेटवून दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Father killed His Daughter

राजस्थानमधून एक मन्न सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह पेटवून दिला. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नराधम बाप शिवलाल मेघवाल हा साधारण १२ वर्षापासून राजस्थान येथील पाली गावात आपल्या कुटुंबापासून विभक्त राहत होता. शिवलाल याची पत्नी आणि मुले गुजरातमध्ये वास्तव्यास होती. पीडितेच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले की, नराधम बापास आपली विवाहित मोठी मुलगी निरमा (वय ३२) ही त्याच्या घरच्या वादाला कारणीभूत असल्याचे वाटत होते. त्यामुळे शिवलाल याच्या मनात निरमाविरोधात प्रंचड राग होता.

भेटीचा फायदा घेत साधला डाव...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी निरमा तिच्या लहान बहिणीसोबत सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी पाली येथील इसाली गावात लग्न समारंभासाठी आली होती. समारंभादरम्यान नराधम बापाने तरूणीची भेट घेतली. त्यानंतर तिघं सोबत घरी जात असताना आपल्या लहान मुलीस मध्येच थांबायला लावले आणि पीडित तरुणीला बोलण्याच्या बहाण्याने दुसरीकडे घेऊन गेला. तिथंच मोठ्या मुलीचा गळा चिरला आणि ओळख पटू नये यासाठी तिचा मृतदेह पटवून दिला.

एक पुरावा अन् घटनेचा फुटली वाचा

नराधम बाप लहान मुलीकडे परत आल्यावर, लहान मुलीला वडिलांच्या हातावर रक्त दिसले. त्यानंतर रक्त दिसल्याने मुलीने घाबरून आरडाओरड केली. मुलीच्या आवाजाने गावकऱ्यांनी मुलीच्या दिशेने धाव घेतली असता बापाने तिथून पळ काढला..

गावकऱ्यांना काही अंतरावर पीडित तरूणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून येताच गावकऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित पुरावे जप्त केले. सध्या आरोपी फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Home Cleaning: कोळ्यांना करा कायमचा रामराम! घरच्या घरी ट्राय करा 'हे' उपाय

Maharashtra Live News Update: बसूबारस निमित्ताने शेतक-यांनी केली गो धनाची पूजा

Shahapur : जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव; नवीन राजपत्राप्रमाणे खास ग्रामसभेत ठराव मंजूर

Railway Station Update : मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर; नावात काय केला बदल? जाणून घ्या

महिलांशी अश्लील संभाषण करतानाचा ऑडिओ लीक, World Cup जिंकवून देणाऱ्या कर्णधाराला संघातून हाकललं

SCROLL FOR NEXT