Lonavala Crime Saam Tv
क्राईम

Crime: बाप बनला हैवान! पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, लोणावळा हादरले

Lonavala Crime: लोणावळ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. बापानेच आपल्या मुलीसोबत हे किळसवाणं कृत्य केले. या प्रकरणी आरोपी नराधमाला पोलिसांनी अटक केली.

Priya More

दिलीप कांबळे, मावळ

बापानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळ्यातील कुसगावमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाप-मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे लोणावळ्यात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा शहराच्या जवळच असणाऱ्या कुसगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला. मुलगी अल्पवयीन आहे. घरात मुलगी एकटी असताना बापाने तिच्यासोबत हे भयंकर आणि किळसवाणं कृत्य केले. या घटनेचा लोणावळ्यात तीव्र निषेध केला जात आहे. आरोपी बापाला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्वस्तरावरून केली जात आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. काँक्रीट इंडिया कंपनीजवळ भैरवनाथनगर कुसगाव येथे आरोपी आपल्या कुटुंबासोबत राहतो. आरोपीची बायको कामानिमित्त बाहेर गेली होती. घरामध्ये मुलगी एकटीच होती याचाच फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार केला.

घटनेची माहिती कुणाला सांगू नको यासाठी देखील आरोपीने मुलीला धमकी दिली होती. पण आई घरी आल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार तिला सांगितला. हे ऐकून मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tip: घरासमोर पपईचं झाड नकोच! जाणून घ्या पाठीमागचं कारण

Akkalkuwa : घाटरस्ता वाहिल्याने अक्कलकुवा तालुक्यातील रस्ता बंद; वाहतूक पूर्णपणे खोळंबली

Pune : स्कूटी घसरली अन् डोकं टेम्पोखाली गेलं, तरूणी ३०० फूट फरफटत गेली, पुण्यात भयंकर अपघात

Pear Pickle Recipe: लिंबू अन् आंब्याचं लोणचं सोडा, घरीच बनवा नाशपतीचं आंबट-गोड लोणचं, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: पुण्यात पीएमपी बसचा अपघात, दोन बस एकमेकांना धडकल्या

SCROLL FOR NEXT