Nashik Crime News saam tv
क्राईम

Nashik Crime News: मद्यधुंद टवाळखोरांचा दुकानावर आणि घरावर कोयत्याने हल्ला,व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime News: मद्यधुंद नशेत दोन ते तीन अज्ञात टवाळखोरांनी दुकानावर व घरावर सेटरवर कोयत्याने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bharat Jadhav

नाशिकमध्ये मद्यधुंद टवाळखोर तरुणांनी दुकानावर आणि घरावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडलीय. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय.दहशत माजवण्यासाठी या टवाळखोरांनी दुकानावर व घराच्या सेटरवर कोयत्याने हल्ला केला.ही घटना सिडको उत्तम नगरात घडलीय.

नाशिकमधील सिडको उत्तमनगरमधील गौरीशंकर मंगल कार्यालय समोरील फर्निचरच्या दुकानावर कोयत्याने हल्ला केला. दोन्ही तरुण हे दारुच्या नशेत होते. दहशत वाजवण्याच्या उद्देशाने त्यांनी हा हल्ला केलाय. हल्लाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान शहरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं सामन्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

पंचवटीत पित्यासमोर निष्पाप तरुणाचा खून

पंचवटीतील बुधवारच्या भाजीपाला बाजारात खरेदीसाठी आलेल्या मुलाचा काही सराईतांनी पैशावरून मुद्दाम वाद घालत एका तरुणाला त्याच्या वडिलांसमोर बेदम मारहाण केली. यात अतिरक्तस्त्राव झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. गाडगे महाराज पुलावर सर्वांदेखत हा प्रकार घडला. या घटनेने नागरिक भयभीत झालेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा सीतागुंफा रोडवरील परदेशी भवनात राहत होता. त्याचे नाव नंदलाल ऊर्फ सूरज जगनकुमार दास (१९) असं आहे.

तो आपल्या वडिलांसह बुधवारी आठवडे बाजारात खरेदीसाठी सायंकाळी सातच्या सुमारास आला होता. वडिलांसमवेत गाडगे महाराज पुलासमोरील बाथरूमसमोरून जात असताना गुंडांचे टोळके तेथे आले आणि त्यांनी पैशावरून विनाकारण वाद घातला. दास आणि गुंडांत जोरदार भांडणानंतर टोळक्याने नंदलालवर हल्ला चढवत त्याला रॉडने बेदम मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT