cctv viral footage x
क्राईम

Crime : दुचाकीवरुन आले अन् डोक्यात गोळी झाडून पळाले, दिवसाढवळ्या तरुणाची हत्या; थरारक घटनेचा Video Viral

Crime News : एका तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून दुचाकीस्वार पळून गेले. भरदिवसा ही थरारक घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

  • डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या

  • घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

  • पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

  • जुन्या वादातून हत्या केल्याचा संशय

Shocking News : पायी चालत जाणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने तरुणावर गोळी झाडून पळ काढल्याचे पाहायला मिळते. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ७ ते ८ च्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मेरठच्या लिसाडी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माजीद नगर येथे हा प्रकार घडला आहे. हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अस्लम आहे. माजीद नगरमध्ये अस्लम त्याच्या कुटुंबासह राहतो.

अस्लमचे काही लोकांशी वैर होते. सकाळी अस्लम रस्त्यावरुन जात असताना दुचाकीवरुन दोघेजण आले. त्यापैकी एकाने अस्लमच्या डोक्यात मागून गोळी झाडली. गोळी लागताच अस्लम जमिनीवर पडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अस्लमवर दीड वर्षांपूर्वीही असाच हल्ला झाला होता, त्यावेळेसही त्याला गोळी लागली होती.

अस्लमचा मकबरा डिग्गी रेल्वे रोड येथील शहेनशाह नावाच्या तरुणाशी वाद होता, या वादातूनच अस्लमवर गोळीबार झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेच्या वेळी रस्त्यावर १० ते १५ लोक उपस्थित होते. यातील काहीजणांनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Face Mask: चमकदार आणि नितळ त्वचेसाठी घरच्या घरी फेस मास्क कसं बनवायचं?

Randeep Hooda: 'आज मी बाबा झालो...'; रणदीप हुड्डाच्या घरी गोंडस मुलीचे आगमन, सोशल मीडियावर केली खास पोस्ट

Maharashtra Live News Update : मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

SCROLL FOR NEXT