Crime  x
क्राईम

Crime : चहासाठी घरी बोलवलं, काकांनी प्लान आखला होता, पुतण्या घरी येताच निर्दयीपणे संपवलं

Crime News : जमिनीच्या वादातून एका तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. काकांनी घरी बोलावून तरुणावर काठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर कुऱ्हाडीने वार करत त्याचा खून केला.

Yash Shirke

  • चहाला बोलावून तरुणाला त्याच्या काकांनी संपवलं

  • जमिनीच्या वादातून तरुणाची केली निर्घुण हत्या

  • तरुणाच्या ३ काकांच्या विरोधात गुन्हा दाखल

Shocking : एका तरुणाला त्याच्या काकांनी चहासाठी घरी बोलावले आणि नंतर कुऱ्हाडीने वार करून त्यांनी तरुणाची हत्या केली. जमिनीच्या वादातून तरुणाला त्याचा जीव गमवावा लागल्याचे म्हटले जात आहे. वादावर तोडगा निघाल्यानंतर अवघ्या ७२ तासांत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील घाड पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील बेलहारी गावात हत्येचा प्रकार घडला आहे. जमिनीच्या वादातून ३ काकांनी त्यांच्यात पुतण्याला कुऱ्हाडीने वार करुन संपवले. मृत तरुणाचे नाव सुरेश गुर्जर असे आहे. पोलिसांनी मध्यस्थी करत जमिनीचा वाद मिटवला होता. ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात तरुणाची हत्या करण्यात आली.

सुरेश त्याच्या मोठ्या भावासोबत, मानराजसोबत गावातील एका कार्यक्रमात जात होता. वाटेत त्याचे ३ काका रामेश्वर, बाबूलाल आणि छोटू महाराज यांनी सूरजला घरी चहासाठी बोलावले. सुरेश घरात पोहोचल्यानंतर तिघांनी एकसाथ त्याच्यावर हल्ला केला. यात सुरेशचा चुलत भाऊ सोनू आणि त्याची पत्नी लक्ष्मी देखील सामील झाले. सर्वांनी काठ्यांनी सुरेशला मारहाण केली, त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले.

जीवघेणा हल्ला झाल्यानंतर सुरेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सर्व आरोपी पळून गेले. पोलिसांनी त्याचा मृतदेह दुनी सीएचसी शवागारात ठेवला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले आणि त्यानंतर सुरेशचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेशचा भाऊ मनराजच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी अजूनही फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oscar: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका; 'कांतारा चॅप्टर १' आणि 'तन्वी द ग्रेट' ऑस्करच्या स्पर्धेत

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जाहीरनाम्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रकाशन

Vande Bharat Train : वंदे भारत चेअर कार आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या

Relationship: अचानक कोणासाठी तरी खास झालात? लव्ह बॉम्बिंग रिलेशन नाही ना? वाचा प्रेमाचा हा नवा ट्रेंड

Onion Export: कांदा उत्पादक शेतकरी संकटात, बांग्लादेशने कांदा आयातीवर लावले निर्बंध| VIDEO

SCROLL FOR NEXT