तरुणाच्या डोक्यामध्ये वीट घालून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. मित्राचे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचीच हत्या करण्यात आली आहे. बेदम मारहाण करत तरुणाच्या डोक्यामध्ये वीट घालण्यात आली होती. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील पद्मानगर परिसरात ही घटना घडली होती. मित्राचे भांडण सोडवण्यासाठी तू का आलास? असं म्हणत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. तरुणाने घटास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी आरोपीने त्याच्या डोक्यामध्ये वीट फेकून मारली. या मारहाणीत गंभीर जमखी झालेल्या तरुणाला रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंतनु काळदाते असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरूवारी रात्री साडेनऊ वाजतच्या सुमारास घडली. मित्राचे भांडण सुरू होते हे भांडण मिटवण्यासाठी शंतनु गेला. त्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी तू भांडण सोडवणारा कोण? तुझा काय संबंध? असं म्हणत त्यालाच लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर शंतनु आपल्या घराच्या दिशेने पळून जात असताना आरोपींनी पाठीमागून त्याच्या डोक्यात वीट फेकून मारली. गंभीर जखमी झालेल्या शंतनूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान या प्रकरणी लातूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात शंतनुच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी अभी सितापे आणि त्याच्या मित्राविरोधात कलम २९३/२५, १०९,११५, ३५२, ३५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी एकाला ताब्यात देखील घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.